Shivsena UBT News: नाशिक शहरातही वोट चोरी? शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने शोधली साडे तीन लाख दुबार नावे!

3.5 Lakh Duplicate Voter Names Found in Nashik: शिवसेना उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दुबार नावांचा पेन ड्राईव्ह देत नावे वगळण्याची केली मागणी.
shivsena ubt nashik voter list
shivsena ubt nashik voter listSarkarnama
Published on
Updated on

Nashik Voters List Controversy: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी "वोट चोरी"हा विषय लावून धरला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील चार मतदारसंघात साडेतीन लाख दुपार नावे आढळली आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने ही नावे शोधली.

देशभर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी "वोट चोरी"हा विषय लावून धरला आहे. नाशिकमध्येही चार विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर 'वोट चोरी' झाल्याचा पुरावा देण्यात आला आहे. मात्र याबाबत काँग्रेस पक्ष सुस्त आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने त्याचे पुरावे शासनाला सादर केले.

यासंदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते दत्ता गायकवाड, खासदार राजाभाऊ वाजे, माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे आदींनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना याबाबत पुरावे सादर केले. दुबार मतदारांची नावे असलेला पेन ड्राईव्ह जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. ही नावे तातडीने वगळण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

shivsena ubt nashik voter list
Congress-MNS : काँग्रेसचा मोठा निर्णय; आगामी महापालिका निवडणुकांमध्ये राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी चाचपणी?

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने गेले दोन महिने शहरातील देवळाली, नाशिक पूर्व, पश्चिम आणि मध्य मतदार संघाच्या मतदार याद्यांचा अभ्यास केला. त्यातून धक्कादायक माहिती पुढे आली. शहरात साडेतीन लाख दुबार मतदार शोधून काढण्यात आली आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही धक्कादायक माहिती आढळली.

shivsena ubt nashik voter list
Shankarrao Gadakh: शंकरराव गडाख नेवाशाच्या मैदानात 'मशाल' घेऊन उतरणार की, 'बॅट'!

नाशिक पूर्व मतदार संघात १.१३ लाख, नाशिक मध्य मतदार संघात ७१ हजार, नाशिक पश्चिम मतदार संघात १.०९ लाख आणि देवळाली मतदारसंघात ५९ हजार दुबार नावे मतदार यादीत आहेत. शहरातील चार मतदार संघात ३.५३ एवढे मोठ्या प्रमाणावर दुबार नावे आहेत. त्यामुळे या सर्व संशयास्पद मतदार याद्यांची तातडीने तपासणी करून ही नावे वगळण्यात यावी.

मतदार यादीत असलेल्या त्रुटी आणि दुबार नावे याचा फायदा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी महायुतीला होऊ शकतो. हे मतदार एकापेक्षा अधिक ठिकाणी मतदान करून पारदर्शक निवडणूक प्रक्रियेला बाधा पोहोचवतील.त्यामुळे याबाबत जिल्हा प्रशासनाची जबाबदारी वाढली आहे.

ही नावे तात्काळ रद्द करून नव्या मतदार याद्या जाहीर कराव्यात. विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाल्याच्या तक्रारी आहेत. त्यापासून धडा घेऊन महापालिका निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, महानगर प्रमुख प्रथमेश गीते, मसुद जिलानी, केशव पोरजे, स्वाती पाटील यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com