Shivsena UBT Politics: शिवसेनेने पोलिसांपुढे गुन्हेगारीचा पाढाच वाचला, पोलीस करतात तरी काय?

Womens Crime and Atrocity Increase, Shivsena Womens Wing Demand Action: महिलांबाबतचे गुन्हे आणि अत्याचारांच्या गुन्ह्यांबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या महिला झाल्या आक्रमक.
Shivsena UBT Womens delegation
Shivsena UBT Womens delegationSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News: राज्यात महिलांशी संबंधित गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. विशेषता पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत राजकीय पक्ष उघडपणे तक्रारी करीत आहेत.

महिलांवरील अत्याचार आणि गुन्ह्यांविरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाची महिला आघाडी शहरात आता चांगलीच आक्रमक झाली आहे. याबाबत महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना निवेदन दिले. तातडीने कार्यवाही न झाल्यास पुढील आंदोलनाला तयार रहा, असा इशारा दिला.

नाशिकसह राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. दररोज महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. त्याबाबतची आकडेवारी अतिशय चिंताजनक आहे. त्यातही पोलीस गुन्हे नोंदविण्यासाठी टाळाटाळ करतात.

असे प्रकार वारंवार घडत असल्याने ही दुर्दैवी बाब आहे. त्याबाबत पोलीस प्रशासन काय भूमिका घेणार आहे?. काय कारवाई केली जाते, असा प्रश्न या संतप्त महिला नेत्यांनी केला.

Shivsena UBT Womens delegation
Jayant Patil : आमदार जगतापांना विखेंसारख्या पराभवाची भीती; जयंत पाटील म्हणाले, 'सत्तेत येताच, त्यांना नवा विषय...'

नाशिक शहर पोलीस उपयुक्त मोनिका राऊत यांना निवेदन देण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत महिलांनी शहराच्या विविध भागात होणारे उपद्रव आणि महिला, विद्यार्थिनी यांच्याबाबत होणारे गुन्हे याची सविस्तर माहिती दिली.

पोलिसांनी आपल्या वचक निर्माण केला तर, हे प्रकार नियंत्रणात येऊ शकतात परंतु तसे होताना दिसत नाही. बदलापूर येथील आदर्श या नामांकित शाळेत शिक्षण घेणाऱ्या चार वर्षांच्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचाराच्या दुर्दैवी घटना घडल्या.

या घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांमध्ये हे प्रकार सतत वाढत आहेत. पोलिस प्रशासनाकडून या संदर्भात विविध उपाय योजना करण्यात येत आहे.

Shivsena UBT Womens delegation
NCP Ajit Pawar: बॅनर बदलल्याने प्रदेशाध्यक्षांसमोरच कार्यकर्त्यांचा घोषणा देत संताप!

पोलिसांनी विशेष कक्ष स्थापन केलेला आहे. त्या मार्फत नियमितपणे कारवाई करण्यात येते. विविध उपाययोजन करण्यात येत असल्याची माहिती यावेळी प्रशासनाकडून सांगण्याचा प्रयत्न झाला. त्यावर संतप्त महिला कार्यकर्त्यांनी पोलिसांना गुन्हे आणि गुन्हेगारीची आकडेवारीच सादर केली.

सध्या राज्यात दर तासाला महिला अत्याचाराच्या ५ घटना घडतात. गतवर्षीच्या गुन्ह्यांचा विचार करता राज्यात सात हजाप ५२१ बलात्कार, नऊ हजार ६८९ अपहरण आणि १६९ हुंडाबळी तर नातलगांकडून होणाऱ्या क्रूर त्रासाच्या अकरा हजार २२६ घटना आहेत.

विनयभंग आणि लैंगिक अत्याचाराच्या सतरा हजार २८१ गुन्हे नोंदविले आहेत. हे सर्व पोलिसांचा प्रभाव आणि वचक कमी झाल्याने होत आहे. नाशिक शहरात पोलिसांनी तातडीने पावले न उचलल्यास शिवसेना ठाकरे गटाकडून तीव्र आंदोलन होईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी उपनेत्या शितल देवरुखकर, श्रृतीताई नाईक, मुंबईच्या माजी नगरसेविका प्रयंका जोशी, जिल्हा उपप्रमुख अॅड एकता खैरे, सीमाताई डावखर आदींनी चर्चेत भाग घेतला.

शहरात सध्या पोलिसांच्या माध्यमातून शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांना टार्गेट करण्यात येत आहे आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षविरुद्ध शिवसेना ठाकरे गट असे शहकाटशहाचे राजकारण होत आहे त्यामुळे पोलिसांविरोधात शिवसेनेची महिला आघाडी सरसावली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com