Shivsena UBT Politics: स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांविरोधात शिवसेना ठाकरे पक्ष आक्रमक, दिला ‘हा’ इशारा!

Shivsena UBT; Shiv Sena Thackeray's party is aggressive against State Bank employees on the issue of Marathi language -परप्रांतीय बँक कर्मचारी मराठी भाषेचा अपमान करीत असल्याची तक्रार शिवसेनेने केली.
Shivsena UBT & SBI employees Agitation at Dhule
Shivsena UBT & SBI employees Agitation at DhuleSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News: देवपूर (धुळे) येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेच्या बँक व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांवर विरोधात मराठी भाषेच्या विषयावर शिवसेना आक्रमक झाली आहे. कर्मचाऱ्यांनी ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर दादागिरीचा आरोप केला आहे. त्यामुळे या प्रश्नावरून शहरात दोन्ही गट आक्रमक झाले आहेत.

यासंदर्भात स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक गांधी आणि कर्मचारी सदाशिव नरहरी अजगे यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कानशिलात लगावली होती. कर्मचाऱ्यांना प्राध्यापिका पद्मा किसन शिंदे यांच्याशी मराठी भाषेच्या प्रश्नावारून कर्मचाऱ्यांनी असभ्य वर्तन केले होते. त्यामुळे कर्मचाऱ्याला शिंदे यांची माफी मागायला भाग पाडले होते. त्यामुळे बँकेचे कर्मचारी आक्रमक झाल्याचे दिसले.

Shivsena UBT & SBI employees Agitation at Dhule
Dr. Zakir Shaikh Politics: राष्ट्रवादीच्या नेत्याची अपघातग्रस्तांना मदत, आई गमावलेल्या बिहारच्या भावंडांनी १७ वर्षांनी घेतली भेट!

बँकेच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी काळ्या फिती लावून निदर्शने केली. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कर्मचाऱ्यांवर दडपशाही करून दादागिरी करतात. त्या विरोधात पोलिसांनी गंभीर कारवाई अशी मागणी बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Shivsena UBT & SBI employees Agitation at Dhule
BJP Politics: महापालिकेची प्रभागरचना भाजपच्या पथ्यावर? विरोधक झाले सावध!

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. परप्रांतीय कर्मचारी जाणीवपूर्वक मराठी भाषेचा अपमान करतात. मराठीत बोलणाऱ्या ग्राहकांचा अपमान केला जातो. त्यांना तासंतास बँकेत ताटकळत ठेवले जाते. याबाबत पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करावा अन्यथा शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख धीरज पाटील आणि उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी यांना पोलिसांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांना कानशिलात लगावल्याने अटक केली होती. शिवसेनेने त्या विरोधात आंदोलन केल्यावर या पदाधिकाऱ्यांना सोडून दिले होते. पोलिसांच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या या कृतीच्या निषेधार्थ जिल्हा पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांची कार्यकर्त्यांनी भेट घेतली.

महाराष्ट्राची भाषा मराठी असल्याने याबाबत सर्व व्यवहार मातृभाषेतूनच करावे असा शासनाचा दंडक आहे. मात्र त्याची सर्रास पायमल्ली केली जाते. त्याबाबत शासनाने हस्तक्षेप करून मराठी भाषेचा वापर बँकेत सक्तीने केला जावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिवसेना ठाकरे पक्षाने आक्रमक होत बँक कर्मचाऱ्यांना दिलेल्या वर्तणुकीवरून शहरात राजकारण चांगलेच आपले आहे. बाबत संबंधित प्राध्यापिकेने माजी आमदार अनिल गोटे यांच्याशी देखील संपर्क केला होता.

--------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com