Jalgaon Politics : चिमणराव पाटील यांनी सतीश पाटील यांना अनुल्लेखाने मारले!

Shivsena v/s NCP Politics, MLA Chimanrao Patil avoided NCP Satish Patil-राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश पाटील यांनी चिमणराव पाटील यांच्यावर टक्केवारीचा आरोप केला होता.
MLA Chimanrao Patil & Dr. Satish Patil
MLA Chimanrao Patil & Dr. Satish PatilSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Politics : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे नेते सतीश पाटील यांनी शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांच्यावर टक्केवारीचा गंभीर आरोप केला होता. नगरपालिकेच्या प्रशासनावर त्यांचा दबाव असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र चिमणराव पाटील यांनी त्यांचा अनुल्लेख करीत बोलणे टाळले. (Shinde Group`s Chimanrao Patil & NCP Satish Patil politics on serious mode)

पारोळा नगरपालिकेच्या (Jalgaon) राजकारणावरून शिवसेना (Shivsena) शिंदे गट (Eknath Shinde) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) (NCP) गटातील राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार चिमणराव पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

MLA Chimanrao Patil & Dr. Satish Patil
Maratha Reservation : ‘भुजबळ साहेब, तुमचे घर काचेचे आहे, हे विसरू नका’

राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार चिमणराव पाटील आणि त्यांचे चिरंजीव यांच्यावर नगरपालिकेत हस्तक्षेपाचा आरोप केला होता. यावेळी त्यांनी टक्केवारीचा देखील उल्लेख केला होता. त्यामुळे पारोळा विधानसभा मतदारसंघातील या दोन्ही विरोधकांत चांगलीच जुपली आहे. दोन्ही नेते पारंपारीक विरोधक असल्याने एकाने केलेल्या आरोपावर दुसऱ्याने उत्तर दिले नाही, असे झालेले नाही

यासंदर्भात आमदार चिमणराव पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली, मात्र विरोधकांच्या नावाचा उल्लेख टाळला. ते म्हणाले, आजवर ‘भूतो ना भविष्य’ असा एरंडोल मतदारसंघात विकासकामांचा झंझावात सुरू आहे. प्रशासकीय मान्यता व वर्कऑर्डर शिवाय आजवर कोणतेही भूमिपूजन केले नाही. चहुत्रे ग्रामपंचायतचे सदस्य हे आपल्याकडे आले, आपण त्यांना आणले नाही. तालुक्यातील नुकत्याच झालेल्या अकरा ग्रामपंचायतींपैकी आठ ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचे वर्चस्व आहे. नुकतेच देवगाव तामसवाडी गटात २० ठिकाणी कामांचे भूमिपूजन झाले.

मतदारसंघात अनेक कामांचे लोकार्पण देखील सुरू आहेत, असे असताना देखील विरोधक हे जनतेची दिशाभूल करीत आहे. मात्र, जनता हुशार असून, येणाऱ्या काळात ते धडा शिकवतील. मतदारसंघात विकासकामे सुरू असल्यामुळे विरोधकांची पोटदुखी वाढली असल्याचा आरोप आमदार चिमणराव पाटील यांनी केला.

यावेळी शिवसेना कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील, बाजार समिती माजी संचालक चतुर पाटील, माजी कृषी सभापती डॉ. दिनकर पाटील, माजी नगराध्यक्ष दयाराम पाटील, तालुकाप्रमुख मधुकर पाटील, माजी शिवसेना शहरप्रमुख बापू मिस्तरी, बाजार समिती माजी संचालक प्रा. बी. एन. पाटील, उपशहर भूषण भोई आदी उपस्थित होते.

MLA Chimanrao Patil & Dr. Satish Patil
Maharashtra Politics : मुश्रीफांनी ठाकरेंना सुनावले, ‘अजित पवार नाटक करणारे नाहीत’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com