Maharashtra Politics : मुश्रीफांनी ठाकरेंना सुनावले, ‘अजित पवार नाटक करणारे नाहीत’

Uddhav Thackeray criticism on Ajit Pawar, Hasan mushrif given reply to Thackeray-उद्धव ठाकरे गटा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टिका केली, हसन मुश्रीफांनी केला पवारांचा बचाव.
Uddhav Thackeray & Hassan mushrif
Uddhav Thackeray & Hassan mushrifSarkarnama
Published on
Updated on

NCP v/s Shivsena Politics : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आजारपणाबाबत टिका केली होती. त्यावर हसन मुश्रीफ पुढे आले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांचा खरपुस समाचार घेतला आहे. (NCP Ajit Pawar group`s Minister Hassan Mushrif defended Ajit Pawar about his illness)

शिवसेनेच्या (Shivsena) उद्धव ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टिका केली होती. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी अजित पवार यांचा बचाव करीत शिवसेनेला उत्तर दिले आहे.

Uddhav Thackeray & Hassan mushrif
Maharashtra Politics : राधाकृष्ण विखे यांनी बाळासाहेब थोरात यांना चांगलेच सुनावले!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तब्येत बरी नसल्याचे कारण समोर येत आहे. मात्र त्यावरून देखील राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काल टोले लगावले होते. पवार यांच्यावर होत असलेली ही टीका मंत्री हसन मुश्रीफ यांनी परतावून लावली आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुश्रीफ यांनी चांगलेच सुनावले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे कधीही नाटक करणारे नेते नाहीत. आत एक आणि बाहेर एक असे ते वागत नाहीत. उपमुख्यमंत्री पवार हे खरोखरच आजारी होते, या शब्दात मुश्रीफ यांनी ठाकरे यांना सुनावले आहे.

Uddhav Thackeray & Hassan mushrif
Maratha Reservation : ‘भुजबळ साहेब, तुमचे घर काचेचे आहे, हे विसरू नका’

मराठा समाजाला आरक्षण मिळावं, हे छगन भुजबळ यांचे देखील मत आहे. मात्र ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नये,असं त्यांचं म्हणणं आहे. जातीनिहाय जनगणना झाल्यानंतर दूध का दूध पानी का पानी होईल, असेही मुश्रीफ सांगितले.

झोमॅटो असो किंवा स्वीगी असो आमचा तसा सेल आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचा आहे. चिन्ह देखील आमच्याकडेच राहणार आहे. प्रतिज्ञापत्र खरी की खोटी हे बोलण्याचा अधिकार कोणत्या नेत्याला नाही, तो निवडणूक आयोगाला आहे. असे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

Uddhav Thackeray & Hassan mushrif
NCP Politics : शेतकऱ्यांचे पैसे दिले नाही, तर साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com