Shivsena News: शिवसैनिकांनी आगामी निवडणुकांसाठी तयारीला लागावे

कळवण येथे शिवसेनेचे संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांच्याकडे प्रतिज्ञापत्र सुपूर्द करताना अंबादास जाधव व पदाधिकारी.
Jayant Dinde with Shivsena leaders
Jayant Dinde with Shivsena leadersSarkarnama
Published on
Updated on

कळवण : तालुक्यात (Nashik) जुन्या- नव्या शिवसैनिकांना (Shivsena) विश्‍वासात घेऊन जनतेचे कामे मार्गी लावावीत व आगामी जिल्हा परिषद, (Z.P.) पंचायत समिती निवडणुकीसाठी कामाला लागावे, असे आवाहन दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख जयंत दिंडे (Jayant Dinde) यांनी शिवसैनिकांना केले. (Shivsena leaders submits affidavits to Shivsena Leader)

Jayant Dinde with Shivsena leaders
Congress News: मोदी सरकारचे धोरण म्हणजेच सामन्यांचे मरण!

कळवण तालुक्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसंपर्क अभियान, संवाद दौरा व सभासद नोंदणी श्री. दिंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील शिवसेना संपर्क कार्यालयात सुरु करण्यात आली आहे. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुकाप्रमुख अंबादास जाधव होते. ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनील पाटील, उपजिल्हाप्रमुख दशरथ बच्छाव, विधानसभा संपर्कप्रमुख तुकाराम गवळी, सह संपर्कप्रमुख संभाजी पवार उपस्थित होते.

Jayant Dinde with Shivsena leaders
Yeola news: महागाईच्या निषेधार्थ काँग्रेसने वाटले फुटाणे!

श्री. दिंडे म्हणाले, शिवसेना पक्ष सोडून गेलेल्या गद्दारांचा विचार न करता सत्तेसाठी गेले ते गेले. आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून पक्ष सोडून जाणाऱ्यांना शिवसैनिकांची ताकद दाखवून देऊ. तसेच, पक्षात सक्रिय होऊ पाहणाऱ्या जुने सैनिक व नवीन सभासद नोंदणी करा, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व बाजार समिती निवडणुकीसाठी कामाला लागावे, असे आवाहन केले.

कळवण तालुका शिवसेनेच्या वतीने १०० प्रतिज्ञापत्र संपर्कप्रमुख दिंडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. तालुक्यात पाच हजार सभासद नोंदणी करण्यात आल्याची माहिती तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांनी दिली.

या वेळी विभागप्रमुख शितलकुमार अहिरे, तालुका संघटक संजय रौंदळ, माजी तालुकाप्रमुख भास्कर भालेराव, उपतालुकाप्रमुख दिनेश बागूल, विनोद भालेराव, राजू वाघ, प्रकाश भालेराव, माजी तालुकाप्रमुख प्रकाश आहेर, जितेंद्र वाघ, माजी विभागप्रमुख नाना देवरे, अभोणा गणप्रमुख राजेंद्र चव्हाण, मधुकर मोरे, शहरप्रमुख राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com