आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनी बोलवली बैठक...

Uddhav Thackeray| Eknath Shinde| निवडणूक आयोगाच्या निर्णायानंतर दोन्ही गटाकडून बैठक बोलवण्यात आली आहे.
Uddhav Thackeray| Eknath Shinde|
Uddhav Thackeray| Eknath Shinde|
Published on
Updated on

Shivsena : खरी शिवसेना (Shivsena) कुणाची हा वाद निवडणूक आयोगामध्ये गेला होता. निवडणूक आयोगाने शिंदे गट आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) ला कागदपत्रे सादर करण्यासाठी सांगितले होते. निवडणूक आयोगाने दोन्ही गटाची कागदपत्रे तपासल्यानंतर आज जवळपास आयोगाची चार तास बैठक झाली. त्यानंतर आयोगाने चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला.

निवडणूक आयोगाच्या निर्णायानंतर दोन्ही गटाकडून बैठक बोलवण्यात आली आहे. आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनी यांनी मातोश्रीवर बैठक बोलवली होती. त्यानंतर आज दुपारी साडेबारा वाजता मातोश्रीवर पुन्हा बैठक होणार आहे. याशिवाय रविवारी वर्षा बंगल्यावर शिंदे गटाची संध्याकाळी सात वाजता बैठक बोलवण्यात आली आहे. दोन्ही गटाच्या बैठकीला पक्षातील सर्व महत्वाचे नेते हजर राहणार आहेत. या बैठकीत पुढील रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. 

Uddhav Thackeray| Eknath Shinde|
मोठी बातमी : ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवले

अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून धनुष्यबाण हे चिन्ह मिळावे, यासाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेण्यात आली होती. त्यावर ठाकरे यांच्याकडून आपले म्हणणे मांडण्यात आले होते. त्यानंतर आज रात्री उशिरा निवडणूक आयोगाने ही कार्यवाही केली आहे. निवडणूक आयोगाचा पुढील निर्णय येईपर्यंत शिवसेना हे नाव आणि चिन्ह हे गोठवले आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेले धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले आहे. त्यामुळे शिंदे गट आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही. तसेच, शिवसेना पक्षाचे नावदेखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत आयोगाला पर्याय द्यायचे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com