Nashik Constituency 2024 : मुख्यमंत्री शिंदे ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत, 'हा' मोठा नेता सोडणार पक्ष

Lok Sabha Election 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे बंडखोर विजय करंजकर आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे ठाकरेंसमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे.
Deepak Karanjkar, Uddhav Thackeray
Deepak Karanjkar, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena Political News : नाशिक लोकसभा मतदारसंघात (Nashik Constituency 2024) शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत लढत आहे. यामध्ये आता एक नवीन राजकीय वळण आले आहे.

त्यामुळे नाशिकची निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे लोकसभा संघटक विजय करंजकर यांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज आहेत.

उध्दव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर वाजे यांनी आपल्या प्रचार देखील सुरू केला. संपूर्ण मतदारसंघात त्यांच्या प्रचाराची एक फेरी पूर्ण झाली आहे. मात्र करंजकर या प्रचारापासून अलिप्त राहिले आहेत. (Lok Sabha Election 2024)

Deepak Karanjkar, Uddhav Thackeray
Sushma Andhare News: ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला गेलेले हेलिकॉप्टर क्रॅश...

करंजकर (Deepak Karanjkar) यांनी यापूर्वीच स्वतःसाठी आणि पत्नी भगूरच्या माजी नगराध्यक्षा अनिता करंजकर यांच्यासाठी लोकसभा उमेदवारी अर्ज नेले आहेत. ते आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्यासाठी त्यांनी पूर्ण तयारी केली आहे. या उमेदवारीमुळे नाशिकच्या राजकारणात (Nashik Politics) नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

करंजकर यांची उमेदवारी खरोखर निवडणुकीसाठी आहे की, माघार घेऊन अन्य राजकीय डावपेचाचा भाग म्हणून आहे याची उत्सुकता आहे. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, विजय करंजकर आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. येत्या 6 एप्रिलला ते उमेदवारी अर्ज मागे घेतील.

सध्या करंजकर आणि शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाच्या वाटाघाटी सुरू आहेत. करंजकर येत्या 7 एप्रिलला शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यासाठी शिंदे गटाचा मोठा नेता नाशिकमध्ये येईल. करंजकर यांच्या प्रवेशामुळे हेमंत गोडसे यांना निवडणूक अधिक सोपी होईल असे चित्र आहे.

Deepak Karanjkar, Uddhav Thackeray
Jayant Patil News: चंद्रहार पाटलांचे काम करा, अन्यथा माझा शेवटचा रामराम असेल; जयंतरावांनी कार्यकर्त्यांना ठणकावलं...

करंजकर यांच्यासोबत असलेले देवळालीचे माजी आमदार योगेश घोलप आणि अन्य काही पदाधिकारी या प्रवेशापासून दूर राहण्याची शक्यता आहे. करंजकर यांचा संबंध प्रामुख्याने देवळाली मतदारसंघाशी येतो. त्यामुळे प्रारंभी घोलप हे करंजकर यांच्यासोबत होते. मात्र, आता त्यांनी ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारात सक्रिय भाग घेतला आहे.

आपण ठाकरे गटासोबतच राहणार असून अन्य कुठल्याही पक्षात जाण्याचा विचार नसल्याचे घोलप यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे येत्या आठवड्याभरात नाशिक मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेत जोरदार राजकीय घडामोडी होण्याच्या होण्याची शक्यता आहे.

Deepak Karanjkar, Uddhav Thackeray
Jayant Patil News: चंद्रहार पाटलांचे काम करा, अन्यथा माझा शेवटचा रामराम असेल; जयंतरावांनी कार्यकर्त्यांना ठणकावलं...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com