Dindori Loksabha Constituency : शरद पवार गटाला धक्का; जे.पी. गावित उमेदवारी दाखल करणार

Sharad Pawar and JP Gavit politics : दिंडोरी मतदारसंघात महाविकास आघाडीत गावित यांच्यामुळे पडली फूट?
Sharad Pawar and JP Gavit
Sharad Pawar and JP GavitSarkarnama

CPM-NCP Politics: दिंडोरी मतदारसंघात महाविकास आघाडी तर्फे शरद पवार गटाचे भास्करराव भगरे उमेदवार आहेत. हा मतदारसंघ माकपसाठी सोडावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यावर तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीला येथे गुरुवारी धक्का बसला आहे.

कारण, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार जे. पी. गावित( JP Gavit) उद्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. गावित आपल्या सहकारी आणि समर्थकांचा नाशिक शहरात रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या निमित्ताने माकपचे शक्तिप्रदर्शनदेखील होईल. या शक्तिप्रदर्शनामुळे दिंडोरी मतदारसंघात जोमात असलेल्या महाविकास आघाडीला धक्का बसण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar and JP Gavit
Sharad Pawar News : शरद पवारांचा राहुरीमधील सभेतून पंतप्रधान मोदी अन् विखे पाटलांवर जोरदार हल्लाबोल!

महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या जागावाटपमध्ये राष्ट्रीय स्तरावर इंडिया आघाडीचे सूत्र पाळण्यात आले आहे. इंडिया आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेत महाराष्ट्रात माकपसाठी एकही जागा सोडण्यात आलेली नव्हती. त्याऐवजी विधानसभेत राज्यातील चार जागा माकपला सोडण्यात येणार आहेत. या तडजोडीवर एकमत झाल्याने महाविकास आघाडीने राज्यातील सर्व 48 मतदारसंघ आपसात वाटून घेतले. यामध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार(Sharad Pawar) गटाला सोडण्यात आला आहे.

माकपने दिंडोरी मतदारसंघातून उमेदवारी दाखल करून नये यासाठी माकपचे नेतेदेखील अनुकूल होते. याबाबत शरद पवार यांनी माकपच्या राष्ट्रीय नेत्यांशीदेखील चर्चा केली होती. मात्र माजी आमदार गावित उमेदवारी दाखल करण्याचा हट्ट धरून होते. त्यामुळे आता शुक्रवारी (उद्या) ते अर्ज दाखल करणार आहेत. माजी आमदार गावित त्यांनी आपण माकपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र इंडिया आघाडीचे ठरलेले सूत्र आणि मतदारसंघाचे जागावाटप यांचा विचार करता गावित शेवटपर्यंत आपली उमेदवारी कायम ठेवतील का? याचीदेखील चर्चा आहे.

Sharad Pawar and JP Gavit
Dindori constituency 2024 : राष्ट्रवादीचा सडेतोड प्रश्न, 'अहो, भारतीताई पाच वर्षांत कांदा प्रश्नावर काय केले'..?

दरम्यान, गावित गेल्या दोन ते तीन लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी दाखल करीत आले आहेत. प्रत्येक निवडणुकीत त्यांना सरासरी एक लाख मते पडतात. यंदा त्यांना मिळणारी मते ही भाजप(BJP) विरोधकांची अन्य कोणाची हे ठरणार आहे. गावित यांना मिळणारी मते विचार करता ते कितपत यशस्वी होतील याविषयी शंका आहे. मात्र, यांच्या उमेदवारीचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com