BJP Politics
BJP PoliticsSarkarnama

BJP Politics : " भाजपात असलो तरी सरकारविरोधात उपोषण करावे लागले,पण...", स्वपक्षीय नेत्याचा निशाणा

Ahmednagar Protest News : केंद्रात आणि राज्यात सत्ता असलेल्या भाजपचा पदाधिकारी असलो तरी प्रथम मी शेतकरी आहे..
Published on

Ahmednagar : राज्यात शासनाने यंदा कमी पाऊस झालेल्या चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित केलेला आहे. मात्र यानंतर राज्यातील अनेक तालुक्यातून आणि गावातून अत्यल्प पाऊस झालेल्या महसूल मंडळातून दुष्काळ घोषित करावा अशी मागणी पुढे आली आहे. यासाठी केवळ विरोधातच नव्हे तर सत्तेत असलेल्या आमदार आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही सरकारच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला.

अशातच नगर जिल्ह्यातील पाथर्डी शेवगाव मतदार संघात भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी आज बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले होते. मात्र प्रशासनाने तातडीने दखल घेत तालुक्यातील वगळलेल्या दुष्काळ सदृश्य गावांत समावेश करावा अशी मागणी असलेले महसुली मंडळांचा यात तातडीने समावेश केला जाईल असे लेखी दिल्यानंतर गोकुळ दौंड यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.

BJP Politics
Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal : काहीही बोलणार्‍या भुजबळांनी लायकी सोडलीय; मनोज जरांगेंचे टीकास्त्र

यंदा राज्यामध्ये सरासरी साडेतेरा टक्के पर्जन्यमान कमी झाले आहे. त्यामुळे एकूणच राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. मात्र राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या बैठकीत केवळ राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित केलेला आहे आणि त्यानंतर नगर(Nagar) जिल्ह्यामधील 14 तालुक्यात 96 महसुली मंडळामध्ये दुष्काळी सदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आलेले आहे. यामुळे ज्या महसुली मंडळात कमी पर्जन्यमान असतानाही सरकारने उपयोजना केल्या नाहीत अशा ठिकाणावरून नाराजीचा सूर सध्या दिसून येत आहे.

नगर जिल्हात यंदा कमी पर्जन्यमान झालेले आहे. धरणातील पाणीसाठा कमी आहे. विशेष करून नगर दक्षिण जिल्ह्यामधील सर्वच तालुक्यांमध्ये अत्यल्प पावसामुळे सध्याच भयान परिस्थिती असून काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावे लागले आहेत. तालुक्यातून पिण्याचे टँकर, जनावरांसाठी चारा डेपो, रोजगार हमी योजनेच्या कामांची मागणी आता पुढे येत आहे.(Drought News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या परिस्थितीत नेहमीच आवर्षणग्रस्त असलेल्या पाथर्डी, शेवगाव या दोन तालुक्यात यंदा अत्यल्प पाऊस असल्याने दुष्काळी सदृश्य परिस्थिती आहे. मात्र राज्य सरकारने घोषित केलेल्या दुष्काळी तालुक्यात शेवगाव आणि पाथर्डी या दोन्ही तालुक्यांचा समावेश नाही.

केंद्रात आणि राज्यात सत्ता असली आणि भाजपचा पदाधिकारी असलो तरी प्रथम मी शेतकरी आहे. या भूमिकेतून भाजप(BJP)चे ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी आज बेमुद्दत उपोषण आंदोलन सुरू केले होते.

BJP Politics
Anjali Damania : भुजबळांची तक्रार घेऊन दमानिया मुख्यमंत्री शिंदेंच्या दरबारात ; म्हणाल्या...

दरम्यान गोकुळ दौंड यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषण आंदोलनानंतर प्रशासकीय पातळीवर तातडीने दखल घेत तहसीलदार आणि इतर प्रशासकीय अधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने दौंड यांना येणाऱ्या दहा डिसेंबर पूर्वी दुष्काळ सदृश्य परिस्थितीतून वगळलेल्या महसुली मंडळांचा समावेश करण्यासाठी कार्यवाही बाबत लेखी आश्वासन देण्यात आले आहे. यानंतर गोकुळ दौंड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेलं बेमुदत उपोषण आंदोलन मागे घेतले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

BJP Politics
Nagar Urban Bank : नगर अर्बन बँक ठेवीदारांच्या 'आसूड' मोर्चाला सामोरे जाताना भाजपच्या सुवेंद्र गांधींची दमछाक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com