Anjali Damania: 'मला भाजप नेत्यांची वाजवायला सगळ्यात जास्त आवडलं असतं, पण…'; अंजली दमानियांचं खळबळजनक विधान

Mahayuti Government : महायुतीतील मंत्र्यांवर सातत्याने गंभीर आरोप केले जात आहेत. यात संजय शिरसाट, संजय राठोड, योगेश कदम यांच्या नावांचा समावेश होता. एकीकडे हे आरोप सुरु असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे हेही वादात सापडले.
Anjali Damania, Devendra Fadnavis News
Anjali Damania, Devendra Fadnavis NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : संतोष देशमुख हत्या प्रकरण, बीडमधील गुन्हेगारी, धनंजय मुंडेंच्या कार्यकाळातील कृषिखात्यातील भ्रष्टाचाराचा आरोप, मंत्री संजय शिरसाटांचं प्रकरण यांसारख्या विविध प्रकरणं उचलून धरत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी सरकारला धारेवर धरलं. आता त्यांनी खळबळजनक विधान केलं आहे.

याचदरम्यान, दमानिया यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री योगेश कदम यांचीही कुंडली बाहेर काढण्याचा इशारा दिला होता. तर दुसरीकडे शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते आणि मंत्र्यांच्या हात धुवून पाठीमागं लागलेल्या अंजली दमानिया यांनी आता थेट भाजपबाबतही मोठं विधान केलं आहे.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शनिवारी (ता.2 ऑगस्ट) यांनी महायुती सरकारबाबत धक्कादायक विधान केलं. त्या म्हणाल्या, भाजप (BJP) नेत्यांकडे प्रमुख कॅबिनेट नाही, नाहीतर त्यांची पण वाजवायला मला सगळ्यात जास्त आवडलं असतं. मात्र, त्यांच्याकडे जास्त चांगली खाती नाहीयेत. अजित पवार आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडे चांगली खाती आहेत, म्हणून त्यांची प्रकरणं बाहेर काढत असल्याचं दमानिया यांनी सांगितलं.

दमानिया म्हणाल्या,सध्या मी बऱ्याच लोकांची माहिती काढत असून राज्यात वाईट पद्धतीनं सरकार चालत आहे. योगेश कदम यांच्याबाबतही प्रचंड माहिती माझ्याकडे आलेली आहे, आता जर ती सगळी माहिती मी बाहेर काढली तर चुकीचा संदेश जाईल, त्यामुळे मी न्यायालयीन लढा देण्याचे संकेतही दमानिया यांनी दिले.

Anjali Damania, Devendra Fadnavis News
Yavat Violence: यवत नक्की कोणी पेटवलं? 'ही' धक्कादायक माहिती समोर

बऱ्याच जणांना फडणवीस यांच्या बोलण्यावरून मी सगळी माहिती काढत आहे असं वाटतं. पण असा कुठलाही विषय नाही. यामध्ये सत्य नाही, अशी स्पष्ट भूमिकाही दमानिया यांनी यावेळी मांडली.

अंजली दमानिया यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केलेल्या 'दादागिरी' च्या वक्तव्यावरही परखड मत व्यक्त केलं. त्या म्हणाल्या, केवळ पुण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दादागिरी वाढलेली आहे, गुंडगिरी वाढलेली आहे, फडणवीस जे बोलले ते योग्य आहे आणि जर अशी दादागिरी वाढत राहिली तर उद्योगधंदे महाराष्ट्रात येणार नाहीत. फडणवीस यांची बाजू घ्यायची म्हणून मी म्हणत नाही, पण हे सत्य असल्याचंही त्यांनी सांगितलं.

आगामी काळात होत असलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी मराठी आणि गुजराती असा वाद पेटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही अंजली दमानिया यांनी सरकारवर केला. पण याचवेळी त्यांनी लोक समजूतदार आहेत, ते या षडयंत्राला बळी पडणार नसल्याचा विश्वासही व्यक्त केला.

Anjali Damania, Devendra Fadnavis News
Jaykumar Gore : पृथ्वीराजबाबांचे ते विधान म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण; जयकुमार गोरेंनी संधी साधली

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी मंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केले होते. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने मुंबईत डान्सबार असल्याचा आरोप परब यांनी विधानपरिषदेत केला होता. परब यांनी यावेळी कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच महायुतीतील मंत्र्यांवर सातत्याने गंभीर आरोप केले जात आहेत. यात संजय शिरसाट, संजय राठोड, योगेश कदम यांच्या नावांचा समावेश होता. एकीकडे हे आरोप सुरु असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे हेही वादात सापडले. आता महायुती सरकारमध्ये खातेबदल करत माणिकराव कोकाटेंना दणका दिल्यानंतर महायुती सरकारची पुन्हा एकदा धडधड वाढण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com