NCP News : शरद पवारांचा जळगाव दौरा भाजपची कोंडी करण्यात यशस्वी ठरला?

Signs of BJP getting tired in the inning played by NCP for Loksabha- शरद पवार यांच्या दौऱ्यानंतर ‘राष्ट्रवादी’ने टाकलेल्या डावात भाजपची दमछाक होण्याची चिन्हे
Girish Mahajan & Eknath Khadse
Girish Mahajan & Eknath KhadseSarkarnama
Published on
Updated on

Eknath Khadse News : शरद पवार यांचा जळगाव दौरा राष्ट्रवादी काँग्रेससाठी दुहेरी फायद्याचा ठरला आहे. या दौऱ्यात भाजपला खिंडार पडले, त्याचबरोबर लोकसभेची फिल्डींग देखील लागली. त्यात एकनाथ खडसे यांची भूमिका लोकसभा निवडणुकीत कळीची ठरणार असल्याने भाजपची आपल्या बालेकिल्ल्यात दमछाक होणार हे नक्की झाले आहे.

जळगाव (Jalgaon) जिल्हयातील दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यामध्ये भाजपच्या (BJP) ताब्यात असलेले हे दोन्ही मतदारसंघ राखण्याचे आव्हान भाजपपुढे आहे. उमेदवार कोण हे सर्वस्वी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या हाती असणार आहे.

Girish Mahajan & Eknath Khadse
Smriti Irani On Sanatan : "जोपर्यंत भक्त जिवंत आहेत.." ; सनातन धर्मावर झालेल्या वक्तव्यानंतर स्मृती इराणी कडाडल्या..

यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत. ते म्हणाले, लोकसभा निवडणूक लढविण्याचे शिवधनुष्य एकनाथ खडसे यांनी उचलावे. ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाला दोन्ही जागा निवडून दिल्या, त्याप्रमाणे ‘राष्ट्रवादी’लाही लोकसभेच्या दोन्ही जागा निवडून देण्यासह विधानसभेच्या जिल्ह्यातील सर्व जागा महाविकास आघाडीला जिंकण्यासाठी प्रयत्न करावेत.

या दौऱ्यात पाटील म्हणाले, की गेल्या २५ ते ३० वर्षांत जळगाव जिल्ह्यातील लोकसभेचे दोन्ही खासदार भाजपचे निवडून दिले आहेत. त्यामुळे खडसे यांनी आता हे कार्य राष्ट्रवादी काँग्रेससाठी केले पाहिजे.

Girish Mahajan & Eknath Khadse
Manoj Jarange News : मनोज जरांगे उपोषण सोडणार का ? संपूर्ण राज्याचं लागलं लक्ष !

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून खडसे काम करीत आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत लढण्याचे शिवधनुष्य तुम्ही उचलले पाहिजे. तसेच, आगामी विधानसभेच्या जिल्ह्यातील सर्व जागा महाविकास आघाडीला जिंकण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. यात तुम्हाला निश्‍चित यश येईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

सध्या जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार आहेत. त्यात रक्षा खडसे या श्री. खडसे यांच्या स्नुषा आहेत. त्या भाजपमध्येच आहेत, मात्र खडसे कुटुंबातून एकच उमेदवार असणार आहे. त्यामुळे भाजप नेत्यांना आत्तापासूनच सावध पावले टाकावे लागणार आहेत.

Girish Mahajan & Eknath Khadse
Nashik Politics : शरद पवारांच्या दौऱ्यात दिसला जि. प. इच्छुकांतील राजकीय गुंता!

भाजपचे मंत्री गिरीश महाजन, एकनाथ शिंदे गटाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खडसे यांच्यातून विस्तवही जात नाही. त्याच्यातील राजकीय वैर सर्वश्रृत असल्याने आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शरद पवार यांच्या दौऱ्यानंतर भाजपसाठी मोठा डाव टाकण्यात राष्ट्रवादी काँग्रेस यशस्वी झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com