Nashik Simhastha Kumbh : ‘हिंदू धर्माचे महत्त्व सांगू नका’; सिंहस्थ बैठकीत आयुक्त-माजी महापौर आमनेसामने

Simhastha Kumbh flag-hoisting meeting turns tense as former mayor and civic commissioner clash over preparations : कुंभमेळ्याच्या तयारीवर दशरथ पाटील यांची टीका; ‘मंदिरे पाडण्यासाठी पत्र दिले होते’ म्हणत आयुक्तांचे प्रत्युत्तर
Nashik Simhastha Kumbh
Nashik Simhastha KumbhSarkarnama
Published on
Updated on

Nashik Municipal Corporation : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकास कामांचा वाद गाजतो आहे. महापालिका आणि शासनावर विरोधकांकडून टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या ध्वजारोहणाच्या बैठकीत झालेली खडाजंगी चर्चेत आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण पुरोहित संघातर्फे येत्या 31 ऑक्टोबरला होत आहे. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी शहरात सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीत महापालिका आणि तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.

या बैठकीत माजी महापौर दशरथ पाटील यांनी टीका केली. अनेक कुंभमेळे पाहिले आहेत मात्र एवढा गलथान कारभार यापूर्वी कधीही नव्हता. नाशिक (Nashik) महापालिकेने कामकाजात तातडीने सुधारणा करावी. हिंदू धर्माचे महत्त्व ओळखा अन्यथा त्याचा कुंभमेळावर परिणाम होईल, असे पाटील म्हणाले.

प्रशासनावर थेट टीका झाल्याने महापालिका आयुक्त चांगल्याच संतापल्या. त्यांनीही माजी महापौर पाटील यांना थेट सुनावले. हिंदू (Hindu) धर्माचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही काही मंदिरे पाडण्यासाठी पत्र दिले होते, असे आयुक्तांनी सुनावले.

Nashik Simhastha Kumbh
Ahilyanagar DJ Ban : डीजेवर अहिल्यानगर प्रशासनाचा दणका; पाथर्डीत स्टेटसवरून 53 जणांवर गुन्हा

महापौर हिमगौरी आडके यांसह विविध लोकप्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. सिंहस्थ कुंभमेळ्याची सुरुवात पुरोहित संघाच्या ध्वजारोहणाने होते. संदर्भात चर्चा करण्यासाठीच्या बैठकीत वेगळाच वाद उद्भवल्याने तो चर्चेचा विषय ठरला.

Nashik Simhastha Kumbh
BJP Narendra Mehta Vs MNS : भाजपच्या नरेंद्र मेहतांच्या शाळेत कांदा-लसूण बंदी, क्लबमध्ये मात्र ‘चमचमीत’ पदार्थ; मनसेचा हल्लाबोल

कुंभमेळ्याची कामे अन् नागरिकांना त्रास

कुंभमेळ्याची अनेक कामे अद्याप अपूर्ण आहेत. त्यामुळे कुंभमेळ्याच्या तयारीवर त्याचा परिणाम होणार आहे. नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्याचे काय करणार असा प्रश्न यावेळी लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला केला.

प्रशासनाचे फक्त आश्वासन

प्रशासनाकडून ध्वजारोहणापूर्वी महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन देण्यात आले. यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष बबलू खैरे यांनी कुंभमेळा हा सर्वपक्षीय आहे. त्याला एका पक्षाचा कार्यक्रम असे स्वरूप येऊ देऊ नका, असा इशारा दिला. यावेळी उपमहापौर विलास शिंदे माजी आमदार बाळासाहेब सानप महंत भक्ती चरणदास यांचे विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com