

Nashik Railway News: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विविध प्रकल्पांना यंदा चालना मिळाली आहे. यामध्ये मुंबई नाशिक आणि कसारा ते मनमाड या मार्गाचे विस्तारीकरण अपेक्षित आहे. त्याचा प्रकल्प अहवाल नुकताच केंद्राने मंजुरीसाठी रेल्वे प्रशासनाकडे दिला आहे. कुंभमेळ्यातील हा सर्वात मोठा प्रकल्प ठरण्याची चिन्हे आहेत.
मुंबई-नाशिक व नाशिक ते भुसावळ हा सर्वाधिक व्यस्त रेल्वे मार्ग आहे. इगतपुरी आणि कसारा या दरम्यान तीव्र चढउताराचा मार्ग आणि बोगदे यामुळे त्याच्या विस्ताराला मर्यादा आहेत. यामुळे गेली अनेक वर्ष रेल्वेचे प्रकल्प रेंगाळले होते. आगामी सिंहस्थ कुंभमेळा विचारात घेऊन केंद्र शासनाने या प्रकल्पाला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी रेल्वेने या प्रकल्पाला मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे सिंहस्थ कुंभमेळ्यातील आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रकल्प म्हणून मुंबई-भुसावळ मार्गाचे विस्तारीकरण करणार आहे.
या प्रकल्पासाठी दहा हजार १५४ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. कसारा ते इगतपुरीदरम्यान देशातील सर्वात लांब बोगदा या प्रकल्पात समाविष्ट आहे. त्यात 235 पूल असून पाच बोगदे आणि 16 मोठ्या रेल्वे पुलांचा देखील समावेश असेल.
मुंबई ते भुसावळ या देशातील अतिव्यस्त रेल्वेमार्गाची क्षमता वाढवण्यासाठी कसारा ते मनमाडदरम्यान तिसरी आणि चौथी नवीन रेल्वे मार्गिका उभारण्यात येत आहे. १० हजार १५४ कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी नाशिक जिल्ह्यातील ५ तालुक्यांतील ४५ गावांमध्ये सुमारे ३३४ हेक्टर जमीन संपादित करण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या या प्रकल्पांतर्गत १३१ किलोमीटर लांबीच्या दोन नवीन मार्गिका उभारल्या जाणार आहेत. यात इगतपुरी, नाशिक, निफाड, चांदवड आणि नांदगाव या तालुक्यांतील जमिनींचा समावेश असून, प्रस्ताव अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या प्रकल्पात २३५ लहान-मोठे पूल, ५ उड्डाणपूल आणि कसारा ते इगतपुरीदरम्यान २४ किलोमीटरच्या सर्वात लांब बोगद्यासह ५ बोगद्यांचे नियोजन आहे.
या मार्गिकेमुळे मुंबई-हावडा मार्गावरील ताण कमी होऊन प्रवासी व मालवाहतूक अधिक सुलभ होईल तसेच नाशिकच्या व्यापार, पर्यटन आणि कृषी क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.