Kalpna Chumbhale & Devidas Pingle
Kalpna Chumbhale & Devidas PingleSarkarnama

Nashik APMC Corruption : नाशिक बाजार समिती 12 कोटींचा भ्रष्टाचार? अजित पवारांच्या 'शिलेदारा'चा भाजप सभापतींवर गंभीर आरोप

Devdas Pingale Vs Kalpana Chumbhale : देविदास पिंगळे यांनी नाशिक बाजार समितीमध्ये 12 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे.
Published on

Devdas Pingale News : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी सभापती देविदास पिंगळे यांनी विद्यमान भाजपच्या सभापती कल्पना चुंभळे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळावर नऊ महिन्यांत १२ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे.

पिंगळे यांनी दावा केला आहे की, विद्यमान संचालक मंडळाच्या ९ महिन्यांच्या कार्यकाळात बाजार समितीत १२ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. नाशिक आणि गिरणारे येथे एक रुपया एकर दराने जमीन मिळण्याची संधी असताना, पदाधिकाऱ्यांनी फक्त भ्रष्टाचारात लक्ष केंद्रित केल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले.

उपसभापती आणि काही संचालक दिवसभर बाजार समितीत ठाण मांडून बसून कर्मचाऱ्यांकडून आणि इतर मार्गाने वसुली करत आहेत, ज्यामुळे समितीच्या आर्थिक नियोजनात मोठा अडथळा येत आहे. भ्रष्टाचारामुळे समितीचे सचिव अरुण काळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून, संचालक मंडळ त्यांना तडजोड करून सेवेत घेण्यासाठी गडबड करत आहे. यासाठी ५० लाख मागत असल्याचा आरोप देखील पिंगळे यांनी केला.

Kalpna Chumbhale & Devidas Pingle
ShivsenaUBT supports Rajendra Patil Yadravkar : संकटात साथ सोडली, शिंदेंच्या आमदारांना शिवसेना ठाकरे सेनाचा पाठिंबा

सभापती चुंभळे यांचे प्रत्युत्तर

माजी सभापती पिंगळे यांच्या आरोपांना विद्यमान सभापती कल्पना चुंभळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच पिंगळे यांच्यावर टीका करताना, त्यांच्याच कार्यकाळात जिल्हा बँक संकटात आल्याची आठवण करून दिली. त्या म्हणाल्या, सत्ता नसल्यामुळे पिंगळे बाजार समितीच्या कामकाजावर टीका करत आहेत. बाजार समितीत कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही. उलट, बाजार समितीच्या नावाने पाच कोटी रुपयांची ठेव ठेवण्यात आली आहे.

Kalpna Chumbhale & Devidas Pingle
VBA–Congress Alliance : काँग्रेस-वंचितची अधिकृत युती जाहीर, 'या' नगरपालिकांमध्ये दाखवणार ताकद; जागा वाटपाचा फाॅर्म्युला निश्चित

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com