Sinner News: जिल्ह्यातील सर्वाधिक रंगतदार निवडणूक यंदा सिन्नर नगरपालिकेची होण्याची शक्यता आहे. मंत्री माणिकराव कोकाटे यांची राज्याची आणि खासदार राजाभाऊ वाजे यांची नगरपालिकेतील सत्ता पणाला लागणार आहे. त्यात तिसरा अँगल किती प्रभाव दाखवतो याची उत्सुकता आहे.
सिन्नरच्या प्रत्येक निवडणुकीत क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे आणि खासदार राजाभाऊ वाजे या दोन गटांमध्ये संघर्ष असतो. नगरपालिका निवडणुकीत त्यात अधिक टोकदार संघर्ष होतो. यंदा मात्र या राजकारणाला एक नवे वळण लागण्याची चिन्हे आहे.
गेल्या आठवड्यात उदय सांगळे यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. श्री सांगळे यांना आपले अस्तित्व दाखविण्यासाठी नगरपालिका निवडणूक लढवावी लागेल. गंमत म्हणजे गेल्या निवडणुकीत मंत्री कोकाटे हे भाजपचे चिन्ह घेऊन लढले होते. भाजपचा झेंडा सांगळे यांच्या हाती असेल.
सिन्नर नगरपालिकेत १८ नगरसेवक आणि नगराध्यक्ष शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार वाजे यांचा आहे. तिला निवडणुकीत क्रीडामंत्री कोकाटे यांचा वाजे गटाने पराभव केला होता. गेली पाच वर्ष या दोन्ही गटांमध्ये नगरपालिकेत विविध प्रश्नांवरून संघर्ष होत आला आहे.
नगरपालिका निवडणुकीला एक वेगळी राजकीय पार्श्वभूमी आहे. त्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथे खासदार वाजे यांना मोठी आघाडी होती. विधानसभा निवडणुकीत मंत्री कोकाटे यांनी शहरात उदय सांगळे यांच्या विरोधात बारा हजार मतांची आघाडी घेतली.
आगामी निवडणुकीत मंत्री कोकाटे, खासदार वाजे आणि उदय सांगळे हे तिघेही मैदानात असतील. त्यामुळे नगरपालिकेत मतदार लोकसभा आणि विधानसभा यापैकी कोणता ट्रेंड पुढे नेणार. यामध्ये मंत्री कोकाटे आणि खासदार वाजे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
महायुतीचाच घटक असलेल्या भाजपचे उदय सांगळे यांच्या निमित्ताने स्वतंत्र निवडणुकीत उतरणार. त्यामुळे महायुतीत फूट अटळ आहे. दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस ही महाविकास आघाडी एकत्र येण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी हे नेते कोणते डावपेच अखतात आणि कोणती राजकीय चाल खेळतात यावर निवडणूक निकाल ठरण्याची चिन्हे आहेत.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.