Rajabhau Waje : मनपाच्या वाटेत आता राजाभाऊ वाजे आडवे, बी. डी. भालेकर शाळेच्या जागी विश्रामगृह बांधण्यावरुन आक्रमक

Nashik Municipal Corporation, B.D. Bhalekar School : बी.डी. भालेकर शाळा पाडून नाशिक मनपा त्याठिकाणी विश्रामगृह बांधण्याचा घाट घालत आहे. मात्र मनपाच्या या निर्णयाला आता खासदार राजाभाऊ वाजे यांनी विरोध केला आहे.
Rajabhau Waje
Rajabhau WajeSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : नाशिक महानगरपालिकेने शहरातील ऐतिहासिक बी. डी. भालेकर शाळेची इमारत पाडून त्या ठिकाणी विश्रामगृह उभारण्याचा केलेला प्रस्ताव तीव्र वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या निर्णयाला नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी तीव्र विरोध दर्शवून मनपाला हा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी केली आहे.

खासदार वाजे यांनी महानगरपालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे की, बी.डी. भालेकर शाळा ही नाशिकमधील अनेक पिढ्यांच्या शिक्षणाशी निगडित असलेली एक ऐतिहासिक व शैक्षणिक परंपरेची ओळख आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांतील हजारो विद्यार्थ्यांनी या शाळेतून शिक्षण घेऊन समाजात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. अशा शाळेची इमारत पाडून तेथे विश्रामगृह उभारणे म्हणजे शहराच्या शैक्षणिक वारशावर अन्याय करणारे पाऊल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

'शाळा काही कारणांमुळे बंद करण्यात आली असली तरी तिचे ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व अमूल्य आहे. अशा ठिकाणी विश्रामगृह उभारणे हे जनतेच्या भावनांना धक्का देणारे आहे,' असे खासदार वाजे यांनी म्हटले आहे. त्यांनी पुढे असेही नमूद केले की, “त्या जागेचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी, शैक्षणिक उपक्रमांसाठी किंवा सामाजिक उपयोगाच्या प्रकल्पासाठी करावा, हेच जनतेच्या हिताचे ठरेल.”(Nashik News)

Rajabhau Waje
Devendra Fadnavis Politics : फडणवीस शब्द विसरले, मंत्रीपदाचा शब्द दिलेल्या आमदाराला केलं थोडक्यात खूश..

खासदार वाजे यांनी पत्राद्वारे मनपाला आवाहन केले आहे की, बी.डी. भालेकर शाळेच्या इमारतीच्या जागेचा वापर विश्रामगृहासाठी न करता ती शैक्षणिक उद्देशासाठी राखून ठेवावी. तसेच, स्थानिक जनतेच्या मतांचा आदर करून कोणताही विकासप्रकल्प राबवावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, मनपा प्रशासनाकडून या विषयावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, शहरातील नागरिक, माजी विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांकडूनही शाळेच्या इमारतीच्या संवर्धनाची मागणी जोर धरू लागली आहे.

Rajabhau Waje
Maharashtra Politics : वंचितमध्ये भूकंप ! कुणाच्या कारभाराला कंटाळून २०० पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले?

गंजमाळ, शालिमार, जुनेनाशिक, दूधबाजार, सारडा सर्कल आदी परिसरातील अत्यल्प उत्पन्न घटकांतील विद्यार्थ्यांसाठी बी.डी. भालेकर शाळा दीपस्तंभ आहे. शाळा फक्त संरक्षितच करू नये तर ती पुनर्जीवित करावी अशी माझी मागणी असल्याचे राजाभाऊ वाजे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com