Nashik Collector : 'एसआयआर' साठी नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद थेट मतदारांच्या दारी, भरपावसात पोहोचले गुजरात सीमेवर

Ayush Prasad Visits Maharashtra-Gujarat Border for SIR Campaign : 'एसआयआर' साठी नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद स्वत: गावोगावी आदिवासी पाड्यांवर भेट देत आढावा घेत आहेत.
Nashik Collector Ayush Prasad Visits Maharashtra-Gujarat Border for SIR Campaign
Nashik Collector Ayush Prasad Visits Maharashtra-Gujarat Border for SIR Campaign Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : भारत निवडणूक आयोगातर्फे मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) सुरू आहे. सध्या सर्वत्र एसआयआरची चर्चा आहे. नाशिक जिल्ह्यात एसआयआर च्या प्रभावी आणि कालबद्ध अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद स्वत: मैदानात उतरले असून ते गावोगावी मतदारांच्या घरी जाऊन कार्यक्रमाचा आढावा घेत आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे काल भर पावसात महाराष्ट्र- गुजरातच्या सीमेवरील ठाणापाडा गावात पोहोचले. एवढेच नव्हे, तर तेथे जाऊन त्यांनी दिव्यांग मतदार भाऊराव गुलाबराव मोरे यांचे प्र- गणना पत्र भरून घेत उपस्थितांना प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यांच्या या दौऱ्याची विशेष चर्चा झाली.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या लोकाभिमुख कार्याची नाशिकमध्ये चर्चा आहे. गेल्या आठवड्यात एक वृद्ध दाम्पत्य आपली समस्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. हे दाम्पत्य जिना चढत वरच्या मजल्यावर जात असताना तेवढ्यात जिल्हाधिकारी वरुन खाली चालले होते. वृद्ध व्यक्तीला जिना चढताना धाप लागल्याचे पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना थांबवलं व आस्तेने त्यांची विचारपूस केली.

त्यांची समस्या जाणून घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना वर येण्याची गरज नसल्याचे सांगितले. त्यानंतर कार्यालयाच्या आवारातील वडाच्या झाडाखाली असलेल्या पारावर त्यांना बसवून तेथूनच त्यांनी काही मिनिटात वृद्द दाम्पत्याच्या जमिनीचा प्रश्न मार्गी लावला होता.

Nashik Collector Ayush Prasad Visits Maharashtra-Gujarat Border for SIR Campaign
Nashik Collector : जिना चढताना धाप लागलेल्या वृद्धाची अडचण ओळखली, जिल्हाधिकारी आयुष प्रसादांनी जागेवरच केला न्याय

ठाणपाडा हे गाव महाराष्ट्र- गुजरातच्या सीमेवरील हातगड ग्रामपंचायतींतर्गत येते. तेथे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी काल सकाळी भेट दिली. तेथे त्यांनी विशेष मतदार यादी सखोल पुनरीक्षण (SIR) अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच एका दिव्यांग मतदार भाऊराव गुलाब मोरे यांच्या घरी जाऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या माध्यमातून एन्युमरेशन फॉर्म (Enumeration Form) भरून घेणे, आवश्यक माहितीची पडताळणी करणे तसेच स्कॅनिंग व डिजिटलायझेशनची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष करून घेतली.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम हा अत्यंत महत्वाचा उपक्रम आहे. त्यामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकऱ्यांनी कामकाज अचूक, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करावे. दुर्गम व सीमावर्ती भागातील प्रत्येक पात्र मतदाराची नोंदणी व माहिती अद्ययावत करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दळवट येथील शासकीय आश्रमशाळेस भेट देऊन पाहणी केली. यावेळी कळवणच्या प्रकल्पाधिकारी डॉ. संख्ये, तहसीलदार रोहिदास वारुळे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी शैक्षणिक कामकाजाची माहिती घेतली.

Nashik Collector Ayush Prasad Visits Maharashtra-Gujarat Border for SIR Campaign
Ayush Prasad : भाजपत या..गिरीश महाजनांनी ऑफर दिली होती? जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितलं काय ते..

या दौऱ्याआधीही त्यांनी येवला तालुक्यातील अंगणगाव येथे प्रत्यक्ष भेट देऊन मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला. तहसील कार्यालयाला भेट देत आढावा घेतला. हा कार्यक्रम कालबद्ध असल्याने सर्व कामे भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्रभावी नियोजन करून काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com