Nashik Collector : जिना चढताना धाप लागलेल्या वृद्धाची अडचण ओळखली, जिल्हाधिकारी आयुष प्रसादांनी जागेवरच केला न्याय

Nashik Collector Ayush Prasad : सरकारी काम आणि सहा महिने थांब हा प्रचलित शब्दप्रयोग आहे. मात्र, प्रत्यक्षात हेच काम सहा मिनिटांत झालं तर, तेही अगदी सहज पणे पारावर बसून ...नाशिकमध्ये तशीच काहीशी घटना घडली.
Nashik Collector Ayush Prasad :
Nashik Collector Ayush Prasad :Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : सरकारी काम आणि सहा महिने थांब असं म्हटलं जातं. पण, एका वयोवृद्द दांम्पत्याचा विषय अवघ्या सहा मिनिटांत नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मार्गी लावला. तोही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील वडाच्या झाडाखाली असलेल्या पारावर बसून.

गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रशासनातील माणुसकी आणि संवेदनशीलतेचा संगम पहावयास मिळाला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी दाखविलेली तत्परता व संवेदनशीलता यामुळे नाशिकच्या देवळाली येथील भीमाबाई सुरंजे आणि त्यांचे पती गंभीरचंद सुरंजे या वृद्ध दांम्पत्याच्या मालकीच्या जमिनीचा प्रश्न जागेवरच काही मिनिटात सुटला.

सुरंजे दाम्पत्याला प्रशासनाच्या गतिमान कार्यपद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव आला. त्यामुळे 'सरकारी काम आणि सहा महिने थांब' हा प्रचलित समज या घटनेने खोटा ठरल्याच्या प्रतिक्रिया उपस्थितांकडून व्यक्त झाल्या.

Nashik Collector Ayush Prasad :
नाशिकच्या 1 हजार 128 अधिकाऱ्यांचा काळजाला भिडणारा निर्णय, सर्वत्र होतय कौतुक

तर विषय असा आहे की, देवळाली येथील भीमाबाई गंभीरचंद सुरंजे यांच्या मालकीच्या मिळकतीचे भोगवटादार वर्ग दोनमधून भोगवटादार वर्ग एक (क वर्ग सत्तप्रकार) मध्ये रूपांतर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यासाठी त्यांच्याकडून पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार आपल्या प्रस्तावावर काय कार्यवाही झाली, याची माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्या चढत होते

वयोमानामुळे जिना चढताना सुरंजे यांना धाप लागली. त्याचवेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद कार्यालयातून खाली येत होते. त्यांची नजर सुरंजे यांच्यावर पडताच त्यांनी थांबून आस्थेने विचारपूस केली. संवादादरम्यान सुरंजे यांच्या प्रलंबित प्रस्तावाची माहिती समजताच, त्यांनी त्यांना वर येण्याची गरज नसल्याचे सांगितले. त्यानंतर कार्यालयाच्या आवारातील वडाच्या झाडाखाली असलेल्या पारावर त्यांना बसवून तेथूनच पुढील कार्यवाही सुरू केली.

दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी श्री. राजपूत हेही लगेचच पाराजवळ आले. त्यांना जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सुरंजे दाम्पत्याच्या समस्येची माहिती देत प्रस्तावाची माहिती घेतली. सुरंजे दांपत्याच्या प्रस्तावावर तातडीने प्रशासकीय कार्यवाही करण्यात आली. प्रकरण अंतिम करून नजराणा भरण्यासाठी श्री. सुरंजे यांच्याकडे चलन देण्यात आले.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांच्या तत्परतेमुळे सुरंजे दाम्पत्याचा प्रलंबित प्रश्न अवघ्या काही मिनिटांत निकाली निघाला. या घटनेमुळे 'सरकारी काम आणि सहा महिने थांब' हा प्रचलित शब्दप्रयोग विसरायला लावणारा अनुभव आल्याच्या प्रतिक्रिया तेथे उपस्थित नागरिकांनी व्यक्त केल्या. (Nashik News)

Nashik Collector Ayush Prasad :
Nashik ZP No Vehicle Day : पीएम मोदींच्या आवाहनाला नाशिक झेडपी'चा प्रतिसाद, दर सोमवारी आता 'नो व्हेइकल डे'

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे प्रशासकीय कामकाजात तत्परतेसाठी ओळखले जातात. एखादे काम तातडीने पूर्ण होणे शक्य असल्यास ते विलंब न लावता संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून आवश्यक कार्यवाही करण्यावर भर देतात. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्याला थेट संपर्क साधतात. दिव्यांग, वयोवृध्द व्यक्ती यांना पहिल्या मजल्यावरील जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासह आवारातील लेखा भवनसाठी लिफ्ट मंजूर केले. या लिफ्टचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.

श्री. गंभीरचंद सुरंजे हे जिना चढत होते. त्यावेळी त्यांची सहज विचारपूस केली. त्यांची समस्या जाणून घेतली. हे काम लगेच होणार होते. त्यामुळे निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांना बोलवून घेत हा विषय मार्गी लावला. हे नियमित प्रशासकीयच काम आहे. त्यात वेगळे असे काहीच केलेले नाही.

आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, नाशिक

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com