बहिणीची साद; आमदार किशोर अप्पा, मातोश्रीवर परत जा!

वैशाली सूर्यवंशी म्हणाल्या, उद्धव ठाकरेंनी संधी दिली तर बंडखोर आमदारांविरोधात निवडणूक लढेन व जिंकेन.
Vaishali Suryawanshi
Vaishali SuryawanshiSarkarnama

पाचोरा : आम्ही सुमारे ३० वर्षांपासून ठाकरे (Thakrey Family) कुटुंबीय व ‘मातोश्री’ शी जोडलेले आहोत. माझे वडील माजी आमदार (स्व.) आर. ओ. तात्या पाटील (R. O. Patil) हे ‘मातोश्री’च्या पुण्याईने आमदार झाले. त्यांनी सतत दहा वर्षे मतदारसंघाचे नेतृत्व केले, पण विचार आणि तत्त्वांशी कधीही तडजोड व प्रतारणा केली नाही. मी देखील त्यांच्याच रक्ताची असल्याने ठाकरे कुटुंबीय व मातोश्री यांचेशीच शेवटपर्यंत एकनिष्ठ व प्रामाणिक राहील. मी माझ्या विचारांवर ठाम असून, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thakrey) यांचा आदेश आपल्यासाठी शिरसावंद्य असल्याचे माजी आमदार (स्व.) आर. ओ. पाटील यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी (Vaishali Suryawanshi) यांनी सांगितले. (we have relation with Thakrey Family over 30 years)

Vaishali Suryawanshi
Nashik News: मतांचा विक्रम करणाऱ्या अमृता पवारांना यंदा संधी हुकली!

वैशाली सूर्यवंशी पुढे म्हणाल्या, की (स्व.) आर. ओ. तात्या व आमदार किशोर अप्पा आम्ही आतापर्यंत ‘मातोश्री’ शीच एकनिष्ठ राहिलो. माझे चुलत भाऊ आमदार किशोर अप्पा पाटील यांनी एकनाथ शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर मला वाईट वाटले. आम्ही दोघे भाऊ बहिणी एक नव्हे तर तीन-चार वेळा एकत्र बसलो. सांगोपांग चर्चा केली. दोघांनी आपले विचार व्यक्त केले.

Vaishali Suryawanshi
Malegaon News: मालेगाव जिल्ह्यात कळवणचा समावेश नको

त्या म्हणाल्या, या वेळी मी किशोर अप्पांना जे झाले ते झाले, आपण परत या, मातोश्रीवर जाऊन उद्धव साहेबांना आपली समस्या सांगा, त्या समस्येचे नक्कीच निरसन ते करतील, पण परत या असे सांगितले. परंतु मला अपयश आले. ते त्यांच्या व मी माझ्या विचारावर ठाम आहे. (स्व.) तात्यांनी जे संस्कार केले व जीवनाचा जो मार्ग सांगितला, त्यावर चालणे त्यांची एकुलती एक मुलगी म्हणून माझे कर्तव्य आहे.

त्यांच्या विचारांची रोजच आठवण करते व त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालल्याने मला ऊर्जा व प्रेरणा मिळते. (स्व.) तात्यांना त्यावेळी लोकसभेच्या उमेदवारीचा शब्द ‘मातोश्री’तून मिळाल्याने त्यांनी त्यादृष्टीने तयारी केली होती. परंतु नियतीने डाव टाकला, त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले, याची खंत असून, मुलाप्रमाणे मुलगीही वारस असल्याने त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करणे व त्यांचे विचार जिवंत ठेवणे माझे कर्तव्य आहे.

संधी दिली तर सोने करू

मी आतापर्यंत कोणताही राजकीय हस्तक्षेप केला नाही. परंतु (स्व.) तात्यांचे हितचिंतक, चाहते यांचे दररोज मोठ्या संख्येने येणारे फोन व माझ्याकडून व्यक्त होणारी अपेक्षा यामुळे मला शांत बसून चालणार नाही. राजकारणात काहीही अशक्य नसते. माझे भाऊ आमदार किशोर अप्पा व मी आमचे विचार, गट, नेते वेगळे असले तरी हे सारे आम्ही खिलाडूवृत्तीने घेऊ. (स्व.) तात्यांची कन्या म्हणून मतदारसंघातील जनतेचा माझ्यावरचा वाढता विश्वास माझा आत्मविश्वास वाढविणारा ठरत आहे. उद्धव ठाकरे, मातोश्री व शिवसेना पक्ष जो काही आदेश देतील, तो मला शिरसावंद्य असेल. त्यांनी संधी दिली तर त्याचे सोने करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल व वडील (स्व.) आर. ओ. तात्या पाटील यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करेल, यावर माझा विश्वास आहे, असेही वैशाली सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com