Chhagan Bhujbal On Bhide : ''...म्हणून भिडे वाट्टेल ते, रोज-रोज नवीन काहीतरी बोलतात !''; भुजबळांनी टोचले कान

Political News : '' महात्मा गांधीविषयीचं भिडेंचं विधान मोदी आणि शाह सुध्दा सहन करणार नाही "
Chhagan Bhujbal - Sambhaji Bhide
Chhagan Bhujbal - Sambhaji Bhide Sarkarnama
Published on
Updated on

Nashik :संभाजी उर्फ मनोहर भिडे यांनी काही दिवसांपूर्वी महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं आहे. गांधी यांचे वडील करमचंद नसून एक मुस्लीम जमीनदार आहेत असे म्हटले होते. या विधानानंतर भिडेंविरोधात सर्वत्र असंतोष उसळला आहे. काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेत भिडे यांच्या अटकेची मागणी केली आहे. तर भिडेंशी भाजपचा काहीही संबंध नसून महात्मा गांधींशी बोललेलं खपवून घेणार नाही असा कडक इशारा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावलं आहे. याचवेळी आता मंत्री छगन भुजबळ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नाशिक येथे माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी संभाजी भिडेंच्या विधानावर रोखठोक भाष्य केले. भुजबळ म्हणाले, संभाजी भिडेंबरोबर जाणं हे आत्मघातकी आहे. राजकारणाच्या दृष्टीनेही. महात्मा गांधींना अशा रितीने बोललं तर देशातील जनता सहन करणार नाहीच, पण गुजरातमधील कोणताही गुजराती बांधव हे सहन करणार नाही. मोदी आणि शाह हेसुध्दा सहन करणार नाही. भिडेंवर कारवाई कडक होत नाही म्हणून ते वाट्टेल ते रोज रोज नवीन नवीन काही तरी बोलतात, असेही ते म्हणाले.

Chhagan Bhujbal - Sambhaji Bhide
Kunal Patil on Sambhaji Bhide : राज्य सरकार संभाजी भिडेंना का पाठीशी घालते आहे?

''...अशा लोकांवर कडक कारवाई झाली पाहिजे !''

महात्मा फुलेंवर ते टीका करतात, पण महात्मा गांधींवरही ते टीका करतात. ज्या पद्धतीने अत्यंत गलिच्छ टीका करतात. माझी खात्री आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) असतील किंवा अमित शाह या कुणालाही ते आवडणार नाही. महात्मा गांधींवरील टीका कुणीही सहन करणार नाही. महात्मा गांधींना आज अख्खं जग नमन करतं. मी अनेक ठिकाणी गेलो. क्वचित एखादा देश असेल तिथे महात्मा गांधींचा पुतळा नाही. जिथे तिथे महात्मा गांधींच्या विचारसरणीला मानलं जातं. आपलसं केलं जातं. अन् इकडे महात्मा गांधींवर गलिच्छ स्वरुपाच्या टीका केल्या जातात. अशा लोकांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी भुजबळ यांनी केली.

''...त्यांचं डोकं ठिकाणावर आहे की नाही.''

भुजबळ म्हणाले, भिडें(Sambhaji bhide)वर गुन्हा दाखल झाला ही चांगली गोष्ट आहे. त्यांच्यावर आम्हीही एक केस दाखल केली आहे. आमच्या बागेतील आंबे खाल्ल्यानंतर मुलगा होईल हे जे काही विधान आहे, त्यावर आमची केस आहे. पण कोर्टात ती केस पुढे पुढे ढकलली जात आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आम्ही कोर्टात गेलो. तारीखच लागत नाही. शेवटी काय सरकार फक्त केस करणार. पण केस केल्यावर ती पटकन वर आली पाहिजे. पण तारखावर तारखा पडत असतात. त्यांचं डोकं ठिकाणावर आहे की नाही तेच समजत नाही अशी टीकेची तोफही त्यांनी यावेळी डागली.

Chhagan Bhujbal - Sambhaji Bhide
Sambaji Bhide Statement ON Mahatma Gandhi : भिडेंच्या समर्थनार्थ भाजप खासदार अनिल बोंडे मैदानात ; यशोमती ठाकूर यांना अटक करा..

पंडित नेहरुंनी देशासाठी काही योगदान नाही असेही भिडे म्हणाले होते. यावरूनही भुजबळांनी त्यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, त्यांचे वडील देशातील सर्वात श्रीमंत वकील, त्यांनी देशासाठी सर्व काही दिलं, स्वत: नेहरू साडेअकरा वर्ष तुरुंगात राहिलेत असेही भुजबळ यावेळी म्हणाले. तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत नसेल तर त्यांची स्तुती करु नका, पण असली टीका मला आवडत नाही.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com