Mumbai News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे. महिनाभर सुनावणी पुढे ढकलली आहे.
सुप्रीम कोर्टात आता २३ ऑगस्ट रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. यापूर्वी कोर्टाने या सुनावणीसाठी २२ जुलै ही तारीख निश्चित केली होती. सुनावणी महिनाभर पुढे ढकलल्याने निवडणुकांचा मार्ग पुन्हा खडतर झाला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्वच पक्षांची लगबग सुरू झाली आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.जवळपास १ वर्षांपासून या प्रकरणी सुनावणी झालेली नाही.
लोकसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर होईल, असे सांगण्यात येत होते, पण विधानसभा निवडणुकीपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यातील 23 महापालिका, 25 जिल्हा परिषद आणि 207 नगरपरिषद निवडणुका होणार आहे. या प्रकरणी कोर्टाकडून 'तारीख पे तारीख' देण्यात येत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभागांची व सदस्यांची संख्या वाढविण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय,प्रभाग व सदस्यसंख्या पूर्ववत करण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय, ओबीसी आरक्षण लागू करायचे की नाही अशा विविध मुद्दयांवर याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची सूचना केली होती. कुठल्याही परिस्थितीत निवडणुका घ्या असं न्यायालयाने म्हटलं होतं. परंतु त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं आणि शिंदे-फडणवीस सरकारने वॉर्ड रचना पुन्हा नव्याने करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.