Ahilyanagar SP : 'RTO' कारभाराच्या पोलखोलसह कुख्यात नांगऱ्या टोळीचा 'सामना'; सोमनाथ घार्गे अहिल्यानगरचे नवे पोलिस अधीक्षक

Somnath Gharge Appointed Ahilyanagar SP After Rakesh Ola Transferred to Mumbai : अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून पोलिस अधीक्षकपदी सोमनाथ घार्गे यांची नियुक्ती झाली आहे.
Somnath Gharge
Somnath GhargeSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar police superintendent news : राज्यभरात सराफी पेढीवर दोरडे घालणाऱ्या कुख्यात नांगऱ्या टोळीचा छडा लावण्यात कामगिरी बजावणारे सोमनाथ घार्गे यांची जिल्हा पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची बृहन्मुंबई पोलिस उपायुक्तपदी बदली झाली आहे. घार्गे रायगड जिल्हा पोलिस अधीक्षकपदी कार्यरत होते. तसं पाहिल्यास, सोमनाथ घार्गे यांनी श्रीरापमूर इथं पोलिस उपअधीक्षक पदाची कारकीर्द गाजवली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रशासकीय प्रमुखांचा बदल्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद यांच्यापाठोपाठ आता जिल्हा पोलिस (Police) अधीक्षक यांची देखील बदली झाली आहे. राज्य सरकारने नुकताच झालेल्या बदल्यांच्या आदेशात ओला अन् घार्गे यांच्या बदलीचा समावेश आहे.

सोमनाथ घार्गे यांनी पूर्वी श्रीरामपूर इथं पोलिस उपअधीक्षक पदावर कारकीर्द गाजवली आहे. कुख्यात नांगऱ्या टोळीवर मकोका अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईचा तपास सोमनाथ घार्गे यांच्याकडे होता. तसेच त्यांच्या काळात न्यायालय (Court) आवारात उडालेल्या टोळी युद्धात त्यांनी गोळीबार करत दहशत मोडीत काढली होती.

Somnath Gharge
Ajit Pawar News: वैष्णवीच्या मृत्यूप्रकरणातली 'ती' बाब अजितदादांना चांगलीच खटकली; बारामतीनंतर कोल्हापुरातही बोलून दाखवलं

आरटीओच्या कारभाराची पोलखोल

सोमनाथ घार्गे यांनी साधारण 2007 साली श्रीरामपूर इथं उपअधीक्षक म्हणून सुत्रे स्वीकारली होती. परराज्यातून चोरी करून आणलेल्या ट्रकवरील बाॅडी व चेसी नंबर बदलून त्याची श्रीरामपूर आरटीओमधून पासिंग करण्यात येत असल्याचे प्रकरण त्यांनी बाहेर काढले. यामुळे आरटीओचा कारभार चव्हाट्यावर आणला होता. याप्रकरणातील टोळीला जेरबंद केले होते.

Somnath Gharge
Nashik Kumbh Mela : फडणवीस, भुजबळ की महाजन? नाशिकमधील शाहीस्नानाच्या तारखा जाहीर करण्याचा मान कुणाला, काय ठरलं?

नांगऱ्या टोळीच्या तपासात सहभाग

कुख्यात नांगऱ्या टोळीने राज्यभर दरोडे टाकत धुमाकूळ घातला होता. त्यात बेलापूर, कोपरगाव, कोळपेवाडी, भानसहिवरे व इतर ठिकाणी सराफी पेढ्यावर भरदिवसा दरोडे टाकत दहशत निर्माण केली होती. नांगऱ्या टोळीवर मकोका लावण्यात आला व त्याचे तपासी अधिकारी म्हणून घार्गे यांची नियुक्ती करण्यात आली होती.

अण्णा लष्करेवर झाडली होती गोळी

श्रीरामपूर न्यायालयात दुहेरी हत्याकांडाच्या सुनावणीदरम्यान टोळी युद्धाचा भडका उडाला होता. यावेळी नेवासे इथल्या अण्णा लष्करे हा आपल्या साथीदारांसह एका टोळीला समर्थन करण्यासाठी उपस्थित होता. यावेळी घार्गे यांच्यासह पोलिसांच्या पथकाने मोर्चा सांभाळत आरोपींचा पाठलाग केला. मोरगे वस्ती परिसरातील शेती महामंडळाच्या जागेत स्वतः घार्गे यांनी अण्णा लष्करे याच्या पायावर गोळी झाडत त्याला ताब्यात घेतले होते. हा थरार आजही श्रीरामपूरकर विरसलेले नाही.

सोमनाथ घार्गेंनी तेव्हा पिस्तूल बाहेर काढलं...

तसेच श्रीराम नवमी यात्रेवेळी दोन समाजातील टोळके मोठ्या संख्येने समोरासमोर आल्यानंतर सोमनाथ घार्गे आणि शहर पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक विजय पाटील यांनी पिस्तुल हातात घेत दोन्ही बाजूच्या जमावाला शांततेचे आवाहन करता हा वाद मिटविला होता. देवळाली येथील बबलू पंडित या चिमुकल्यांच्या हत्याकांडाचा तपासही त्यांच्याकडेच होता. आता सोमनाथ घार्गे जिल्हा पोलिस प्रमुख म्हणून सुत्रे हातात घेताना, श्रीरामपूरमध्ये गाजविलेल्या कारकि‍र्दीला उजाळा मिळाला आहे.

17 हजार समाजकंटकांवर कारवाई

राकेश ओला यांची प्रशिक्षणार्थी असताना, श्रीरामपूर इथं नियु्क्ती होती. त्यांच्या कार्यकाळात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडली. जिल्ह्यातील जातीयवादी तणाव नियंत्रणात आणला. सराईत गु्न्हेगारांवर मकोकानुसारक कारवाई केली. निवडणुकीच्या काळात जिल्ह्यातील 17 हजार समाजकंटकांवर कारवाई केली. ओला यांची काही दिवसांपूर्वीच भारतीय पोलिस सेवेतील वरिष्ठ निवड श्रेणीत पदोन्नती मिळाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com