
Kolhapur News : वैष्णवी हगवणे प्रकरणात मीडियाला काही माहिती नाही, दुर्दैवाने काही अँकर जाणूनबुजून मला टार्गेट करत असल्याचा आरोप करत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी (Ajit Pawar) चांगलाच संताप व्यक्त केला. कारण नसताना मला टार्गेट करून बदनाम करत आहेत. दूरपर्यंत माझा संबंध नाही. आरोपींना अजिबात सोडू नका अशा माझ्या पोलिसांना सूचना दिल्या होत्या. तसेच आज (ता.23 मे) संध्याकाळी कोल्हापूरचे कार्यक्रम आटोपून मी कस्पटे कुटुंबियांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेणार असल्याचंही अजितदादांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवारी(ता.23) कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी वैष्णवी हगवणे संशयास्पद मृत्यूप्रकरणावर सडेतोड भाष्य केलं. ते म्हणाले, गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यात लक्ष घातले आहे.पालकमंत्री या नात्याने मी स्वतः देखील त्यामध्ये लक्ष घातले असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
हगवणे परिवारातील कोणीही दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. कारवाईत कोणतीही कसूर ठेवणार नाही. याबाबतची पोलीस प्रशासनाने काळजी घेतली आहे. राज्य सरकार कस्पटे कुटुंबासोबत आहे. माझे विचार किती स्पष्ट आहेत हे सर्वांना माहिती असल्याचंही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितलं.
तसेच जवळचा असो वा लांबचा असो त्याचा विचार आपण करत नाही. कायदा सर्वांना समान आहे. फोटो काढला म्हणजे माझा दोष नव्हे. मीडियाला अजित पवार यांच्याशिवाय उद्योग नाही. अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) प्रकरणावरुन माध्यमांवर ताशेरे ओढले.
सर्व वधूंना सूचना आहे की, जरा जरी संशय आला तर कारवाईसाठी पाठपुरावा करावा. त्यामुळे असे प्रकार पुन्हा होणार नाहीत, असं आवाहनही अजित पवारांनी कोल्हापुरातून केले आहे.
दरम्यान, घटनेनंतर राजेंद्र हगवणे हा फरार होता. शुक्रवारी सकाळी त्याला अटक करण्यात आली आहे. मात्र, हगवणे आणि अनेकजण साथीदार हे तळेगावसह आजूबाजूच्या परिसरात वावरत होते. शिवाय कोल्हापूर जिल्ह्यात देखील त्याने एक दिवस मुक्काम केल्याचे पोलिस तपासात समोर आल्याची माहिती आहे.
अजित पवारांनी ही घटना घडल्याची माहिती कळल्यावर पिंपरीच्या सीपींना फोन केला आणि म्हटलं कोणी का असेना कारवाई करा. ज्या मुलीने आत्महत्या केली, तिचा नवरा, सासू, नणंद आतमध्ये आहे. सगळे अटकेत आहेत. सासरा पळून गेला. तो पण सापडेल, पळून पळून जातो कुठं? सीपींना सांगितले, कारवाई झाली पाहिजे. तीन पथकं रवाना केली असेल सात करा पण फरार आरोपींना अटक करा, असंही सांगितलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.