Ambadas Danve : `जो थैल्या उघडेल त्याला बदली` हे सरकारचे धोरण!

राज्य सरकार पोलिसांसह अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये व्यावहार करीत असल्याचा आरोप दानवे यांनी केला.
Ambadas Danve
Ambadas DanveSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : (Mumbai) सध्याचे सरकार (Maharashtra Government) पुर्णतः अपयशी झाले आहे. कायदा-सुव्यवस्था (Police) रसातळाला गेली आहे. भरती होत नाही. पदोन्नती नाही, फक्त बदल्यांमध्ये व्यावहार करण्यात हे सरकार व त्यातील नेते व्यस्त आहेत. जो थैली उघडेल त्याला बदली हा व्यावहार सुरु आहे. हे सरकार भ्रष्टाचाराच्या (Corruption) तक्रारींची चौकशी देखील करीत नाहीत, अशी टिका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केली. (Present state Government involve in all type of corruptions)

Ambadas Danve
Dhule Loksabha; शिवसेनेच्या मतांची वजावट हीच भाजपची डोकेदुखी!

अंतिम आठवडा प्रस्तावाच्या चर्चेत अंबादास दानवे यांनी आज विधान परिषदेत राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळ्याच्या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांवर ईडी आणि सीबीआय सारख्या यंत्रणांचा दुरुपयोग करून कारवाई केली जाते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे प्रकरण ताजे आहे. संजय राऊत, हसन मुश्रीफ यांच्यावर कारावई केली जाते, मात्र सत्तादारी वर्ग विरोधकांनी तक्रार केल्यावर चौकशीही होत नाही.

Ambadas Danve
Ministers absent : विधान परिषद तहकुबीची नामुष्की

श्री दानवे म्हणाले, या सरकारने घोषणांचा सपाटा लावला आहे मात्र कार्यवाही काहीच नाही. शेतकरी, शिक्षण, रोजगार, कायदा व सुव्यवस्था, विरोधकांवर ईडी कारवाई, बदल्यांतील गैरव्यावहार, पोलिसावंर होणारे हल्ले व भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या संशयीतांना राज्य सरकारचे संरक्षण आहे अशा विविध विषयांवर अत्यंत आक्रमक शैलीत मांडणी केली. याबाबत सरकार संबंधीतांवर कारवाई करील काय? याचे उत्तर मिळत नाही.

ते म्हणाले, समृध्दी महामार्गावर संभाजीनगर नजीक एक अपघात झाला. त्यात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. त्यांना पाऊन तास रुग्णवाहिका मिळाली नाही. मेहकर येथे अपघात झाला, तीथेही त्याचीच पुनरावृत्ती झाली. सव्वा तास त्यांना उपचार मिळाले नाही. जेव्हा जखमी रुग्णालयात गेले तेव्हा त्यांना प्राणवायुची सुविधाही नव्हती. त्यांच्यावर योग्य वेळेत उपचार न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. भौतिक विकास होताना सुविधांचे काय? याचाही विचार झाला पाहिजे.

Ambadas Danve
Eknath Khadse; गुलाबराव असते तर एव्हढी चर्चा झाली असती का?

संभाजीनगर येथे विरोधात एक आंदोलन झाले. त्यात औरंगजेबाचा फोटो लावण्यात आला रात्री बारापर्यंत लाऊडस्पीकरचा वापर झाला. मात्र पोलिसांनी परवानगी दिली नाही. त्यानंतर हिंदू समाजाने मोर्चा काढला. त्यात पालकमंत्री सहभागी झाली नाही. अन्य एक मंत्री झाले. या मंत्र्यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे विचारणा केली. खरे तर त्या मोर्चाला परवानगी देणे आवश्यक होते, ती दिली नाही. मग त्यात मंत्री कसे सहभागी झाले? असा प्रश्न त्यांनी केला.

Ambadas Danve
Nashik Loksabha; अमृता पवार ठरू शकतात लोकसभेच्या गेम चेंजर!

सध्या सरकार केवळ बदल्यांमध्ये व्यस्त आहेत. त्यात पोलिसांच्या बदल्यांमध्ये मोठा व्यवहार होत आहे. जो थैली उघडेल त्याला बदली. प्रामाणीक अधिकाऱ्यांसह इतरांवर अन्याय होतो. भरती, पदोनन्ती नाही फक्त बदल्यांमध्ये सरकारला रस आहे. पोलिस चांगले काम करीत आहे, मात्र त्यांचा धाक कमी होत आहे की काय असा प्रश्न पडावा. कारण गेल्या तीन महिन्यांत पोलिसावंर हल्ल्यांच्या तीस घटना घडल्या. याबाबत सरकार कारावईच करीत नाही. कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिकट झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com