Sudhakar Badgujar Politics: सुधाकर बडगुजर यांना डोक्यावर घेऊन राष्ट्रीय अध्यक्षांचा अपमानही भाजप विसरणार का?

Sudhakar Badgujar; BJP's women national president Vijayatai Rahatkar insult from Sudhakar Badgujar is insignificant for BJP?-विजयाताई रहाटकर यांच्या नाशिकच्या कार्यक्रमात सुधाकर बडगुजर यांनी केली होती तोडफोड.
Sudhakar Badgujar & Vijaya Rahatkar
Sudhakar Badgujar & Vijaya RahatkarSarkarnama
Published on
Updated on

Sudhakar Badgujar News: सत्तेसाठी काहीही इथपर्यंत भाजपचा प्रवास पोहोचला आहे की काय? अशी स्थिती आहे. विशेष म्हणजे यामध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन नाशिकवर आपला राजकीय वरचष्मा ठेवण्यासाठी भाजपाचा अपमान देखील विसरणार का? अशी चर्चा आहे. शिवसेनेचे बडतर्फ नेते सुधाकर बडगुजर यांच्याबाबत एक नवी चर्चा पुढे आली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष सातत्याने एकसंघ महाराष्ट्राचे समर्थन करीत आला आहे. भाजपने मात्र राज्यात सत्ता आल्यावर वेगळा विदर्भ व्हावा असा एक नवा अजेंडा हाती घेतला होता. राज्यात भाजपची सत्ता आल्यावर २०१६ मध्ये वेगळा विदर्भ व्हावा अशी मागणी भाजपच्या काही नेत्यांनी रेटली होती.

Sudhakar Badgujar & Vijaya Rahatkar
Mangesh Chavan Politics: गृहमंत्री अमित शहा यांच्या आवाहनाला भाजपच्या 'या' आमदाराचा अनोखा प्रतिसाद!

भाजपच्या या मागणीला सर्वप्रथम सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने प्रखर विरोध केला होता. त्यावरून राज्यभर राजकारण पेटले होते. भाजपच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांनी देखील या मागणीला समर्थन दिले होते. त्यामुळे नाशिकमध्ये एक वेगळाच वाद झाला.

Sudhakar Badgujar & Vijaya Rahatkar
Raj Thackrey politics: विज्ञाननिष्ठ राज ठाकरेंच्या सैनिकांना वास्तूशाश्त्राच्या मोहात, बदलली पक्ष कार्यालयाची दिशा, मनसेची दशा बदलणार का?

शहरातील श्रीकृष्ण लॉन्स येथे श्रीमती रहाटकर यांच्या उपस्थितीत महिलांचा मेळावा सुरू होता. मेळावा सुरू असताना सुधाकर बडगुजर यांनी कार्यकर्त्यांसह त्यात तोडफोड केली. खुर्च्या फेकून देण्यात आल्या. मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी झाल्याने विजयाताई राहटकर यांना अक्षरशः कार्यक्रमातून बाजूच्या खोलीत जाऊन बसावे लागले होते.

या सगळ्या गदारोळात भाजपच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा असलेल्या श्रीमती रहाटकर अक्षरश: रडकुंडीला आल्या होत्या. सत्तेत सहभागी पक्षाकडूनच थेट भाजपच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा अपमान झाला होता. मुंबई नाका पोलिस ठाण्यातभाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते रात्री उशीरापर्यंत ठिय्या देऊन बसले होते. हा गदारोळ झाल्यावर श्री बडगुजर तातडीने तेथून निघून गेले. शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्राच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सत्यभामा गाडेकर त्यावेळी तेथे पोहोचल्या. नंतर पोलीसही आले. या संदर्भात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

त्यातून श्री. बडगुजर अलगद निसटले, मात्र श्रीमती गाडेकर, मंगला भास्कर, ज्योतीताई देवरे, मंदाताई गवळी, राजेश थेटे, आशिष साबळे, प्रशांत काळे, सरप्रीतसिंग ब्रार असे बारा कार्यकर्ते त्यात अडकले. त्यांना बारा दिवस जेलमध्ये राहावे लागले. यामध्ये शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्या श्रीमती गाडेकर संकटात आल्या, त्याचवेळी भाजपच्या नेत्या श्रीमती रहाटकर अशा दोन महिला नेत्यांना त्रास झाला.

त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या सर्वच नेत्यांनी हा प्रकार अतिशय गांभीर्याने घेतला होता. भाजपच्या सर्वच आमदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी त्यावर शिवसेना विरोधात आवाज उठवला. भाजपच्या महिला अध्यक्षांचा अपमान तर झालाच मात्र घडलेल्या प्रकाराने त्या अक्षरशा रडकुंडीला आल्या होत्या.

सध्या भाजपला नाशिकच्या महापालिकेत शंभर प्लस नगरसेवक हवे असल्याचा राजकीय ध्यास लागला आहे. या ध्यासापोटी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन भाजपच्या महिला अध्यक्षांचा अपमानही विसरायला तयार झाले आहेत का? पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांना पडलेला प्रश्न आहे.

गेली काही दिवस भारतीय जनता पक्षात बडगुजर प्रकरण चांगलेच तापले आहे. सिडको परिसरात त्याचा नकारात्मक फटका भाजपच्या अन्य उमेदवारांना बसू शकतो असे पक्षाच्या नेत्यांनीच मान्य केले आहे. असे असताना जलसंपदा मंत्री महाजन काय निर्णय घेतात याची सगळ्यांना आता उत्सुकता आहे.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com