Sudhakar Badgujar: संजय राऊतांचा तिसरा निष्ठावंत फुटला! सुधाकर बडगुजरांच्याबाबत काय चूक केली?

Sanjay Raut Politics Nashik Shivsena: संजय राऊत यांनी नाशिकमध्ये आपली एक खास यंत्रणा तयार केली होती. शिवसेनेचे नाशिकचे संघटनात्मक नियंत्रण प्रदीर्घकाळ राऊत यांच्याकडे राहिले आहे.
Sudhakar Badgujar |Sanjay Raut
Sudhakar Badgujar |Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut News: खासदार संजय राऊत यांचे "नरकातला स्वर्ग"हे पुस्तक सध्या चर्चेत आहे. मात्र या पुस्तकात खासदार राऊत यांनी सांगितलेल्या आणि व्यक्त केलेल्या भावना त्यांच्याच सहकाऱ्यांना पचलेल्या नाहीत असे दिसते. निष्ठावंत असलेलेच राऊत यांना सोडून जाताना दिसतात. सुधाकर बडगुजर हे पक्षाला 'जय महाराष्ट्र' करण्याच्य तयारीत होते. मात्र, पक्षानेच त्यांची हकालपट्टी केली.

'नरकातला स्वर्ग'या आपल्या आत्मकथनात शिवसेना नेते खासदार राऊत यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना या दोघांवरील निष्ठेबाबत अनेक विधाने केली आहेत. त्यांच्या या भावना प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिकाच्या आहेत, अशी त्यांची भावना व्यक्त होती मात्र नाशिक या अपवाद ठरतोय.

'नरकतला स्वर्ग' या पुस्तकात राऊत यांची ईडीच्या कारवाईनंतर न्यायालयीन कोठडीत परवानगी झाली. तेव्हा त्यांना ऑर्थर रोड कारागृहात नेण्यात आले. कारागृहाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या गर्दीत अजय बोरस्ते, विजय करंजकर, सुधाकर बडगुजर आणि दत्ता गायकवाड या नाशिकच्या चार पदाधिकाऱ्यांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला आहे. हे कार्यकर्ते दिसल्याने त्यांना मोठा अभिमान वाटला होता. मात्र पुस्तकातील या भावना प्रत्यक्षात टिकल्या नाही, असे दिसते.

Sudhakar Badgujar |Sanjay Raut
BJP vs Shiv Sena MNS : 'ठाकरे बंधू एकत्र येणार, पण तिथं अनेक 'शकूनी मामा''! मंत्री राणेंनी नेमकं कोणाला फटकारलं

राऊतांची नाशिकमध्ये खास यंत्रणा

संजय राऊत यांनी नाशिकमध्ये आपली एक खास यंत्रणा तयार केली होती. शिवसेनेचे नाशिकचे संघटनात्मक नियंत्रण प्रदीर्घकाळ राऊत यांच्याकडे राहिले आहे. त्यातूनच अजय बोरस्ते, विजय करंजकर, सुधाकर बडगुजर आणि दत्ता गायकवाड हे चार सहकारी त्यांचे 'खास' होते. या खास लोकांना नेहमीच प्रत्येक गोष्टीत झुकते माप मिळाले. त्यामुळे अनेकांवर अन्याय झाल्याची भावना सुद्धा वाढली.

राऊत यांची निवड चुकली?

या चार खास निष्ठावंत यापैकी सर्वात आधी अजय बोरस्ते हे एकनाथ शिंदे यांच्या गोटात दाखल झाले. त्यानंतर लोकसभेला उमेदवारी मिळाली नाही म्हणून विजय करंजकर हे एकनाथ शिंदे यांच्या दारात गेले. आता सुधाकर बडगुजर यांनीही तोच मार्ग पत्करत भाजपचे दार ठोठावले आहे. दत्ता गायकवाड वगळता राऊत यांचे तीन विश्वासू शिलेदार विश्वासाला पात्र ठरले नाहीत. यात राऊत यांची निवड चुकली की सोडून गेलेल्यांची निष्ठा दिखाऊ होती, हा शिवसेना कार्यकर्त्यांत चर्चेचा विषय आहे.

पराभवानंतरही बडगुजरांना बढती

सुधाकर बडगुजर यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती. ते निवडून येणार नाहीत असा जाणकारांचा होरा होता. मात्र राऊत यांच्याशी असलेली जवळीक यातून कोणाचेही हे सत्य सांगण्याची हिंमत झाली नाही. असे करण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित त्याचीच रवानगी पक्षाबाहेर झाली असती. एवढे बडगुजर राऊत यांच्या जवळ होते.

निवडणुकीच्या निकालानंतर मात्र चित्र बदलले. या बदललेल्या परिस्थितीतही बडगुजर यांना जिल्हाप्रमुख पदावरून बढती देत उपनेते करण्यात आले होते. खासदार राऊत यांचे हे निर्णय आणि माणसे निवडण्याची शैली हाच आता टिकेचा विषय बनला आहे.

Sudhakar Badgujar |Sanjay Raut
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना पुढचा धक्का थेट दिल्लीतून...; तब्बल पाच खासदार शिंदेंच्या संपर्कात?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com