BJP vs Shiv Sena MNS : 'ठाकरे बंधू एकत्र येणार, पण तिथं अनेक 'शकूनी मामा''! मंत्री राणेंनी नेमकं कोणाला फटकारलं

BJP Nitesh Rane Reacts on Shivsena Uddhav Thackeray and MNS Raj Thackeray Alliance in Nagpur: भाजप मंत्री गडचिरोलीला जाण्यापूर्वी नागपूर इथं थांबून पत्रकारांशी संवाद साधताना ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या मुद्यावर भाष्य केले.
BJP vs Shiv Sena MNS
BJP vs Shiv Sena MNSSarkarnama
Published on
Updated on

Nitesh Rane Reaction : राज्यात ठाकरे बंधू एकत्र येत असल्याची चर्चा आहे. यावरून शरद पवारांपासून ते देवेंद्र फडणवीसांपर्यंत सर्वांनीच प्रतिक्रिया दिली आहे. आता भाजप मंत्री नीतेश राणे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

"ठाकरे कुटुंब म्हणून ते एकत्र येत असेल, तर चांगली गोष्ट आहे. पण अनेक लोक शकूनी मामाच्या भूमिकेत तिथं आहेत. आता तेच दोन्ही भावांनी एकत्र यावे, असे लेक्चर देत आहेत", असे म्हणत, नाव न घेता भाजप मंत्री नीतेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांना टोला लगावला.

भाजप (BJP) मंत्री नीतेश राणे गडचिरोली जाण्यापूर्वी नागपूर इथं थांबले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, या प्रश्नावर त्यांनी काहीशी सकारात्मक भूमिका मांडता, खासदार संजय राऊत यांना मात्र टोला लगावला.

मंत्री नीतेश राणे म्हणाले, "शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसेचे नेते राज ठाकरे या दोन्ही भावांनी काय करावे, हा त्यांचा कौटुंबिक विषय आहे. ठाकरे कुटुंब म्हणून ते एकत्र येत असेल, तर चांगली गोष्ट आहे". मात्र, ज्यांनी त्यावेळी ठाकरे कुटुंब तोडले तेच आता एकत्र येण्याची गोष्ट करत आहे. जेव्हा राज साहेबांनी शिवसेना सोडली, तेव्हा संजय राऊत यांची गाडी जाळण्यात आली होती. अनेक लोक शकूनी मामाच्या भूमिकेत होते. आता तेच दोन्ही भावांनी एकत्र यावे, असे लेक्चर देत आहेत, असे मंत्री नीतेश राणे यांनी म्हटले.

BJP vs Shiv Sena MNS
Nitesh Rane: नितेश राणे अजूनही 'ईको फ्रेंडली ईद'वर ठाम, प्यारे खान यांना दिला उलट सल्ला

इको फ्रेंडली ईद, या भूमिकेवर मंत्री नीतेश राणे ठाम आहेत. यावरून राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान आणि त्यांच्यात वाद पेटला आहे. प्यारे खान यांनी नोटीस बजावणार असल्याचा इशारा दिला आहे. यानंतरही मंत्री राणे यांनी भूमिका कायम ठेवली आहे.

BJP vs Shiv Sena MNS
Raj Thackeray Pune Visit : 'मनसे'अध्यक्ष राज ठाकरे येणार पुण्यात ; युतीच्या चर्चांना फुलस्टॉप अन् स्वबळाची घोषणा होणार?

प्यारे खान यांना मंत्री राणेंचा सल्ला

प्यारे खान नोटीस बजावणार असल्याच्या प्रश्नावर मंत्री राणे यांनी अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष म्हणून तुम्ही मुस्लिम आणि अल्पसंख्याक समाजाला एकत्रित कसे करू शकता, त्यांचे प्रबोधन कसे करू शकता, हे काम प्राधान्याने करावे. सध्या प्यारे खान यांची जी भूमिका आहे, ती इस्लामला बदनाम करणारी आहे, असे सुनावले.

...तर काही बिघडत नाही

इको फ्रेंडली होळी, इको फ्रेंडली दिवाळी, फटाकेमुक्त दिवाळी, असे असंख्य सल्ले हिंदू समाजाला दिले जातात तेव्हा हिंदू समाज समजून घेतो. आम्ही दुसऱ्या धर्माला नावे ठेवत बसत नाही. हिंदू समाज आपला धाक दाखवत नाही. तसाच विचार मुस्लिमांनी करावा, अशी माझी भूमिका आहे. मुस्लिमांनी इको फ्रेंडली बकरी ईद केली तर काही बिघडत नाही. उलट ते त्यांच्या फायद्याचेच आहे, असेही मंत्री राणे यांनी म्हटले.

छोट्या तलावांमधील मासेमारीला स्थगिती

छोट्या तलावांमधील मासेमारी कंत्राटावर स्थगिती कायम ठेवली आहे. मोठ्या तलावाबद्दलचा स्थगिती काढलेली आहे. त्यामुळे तिथे मासेमारीच्या कंत्राटासाठी स्पर्धा होईल. मासेमारांचा फायदा होईल. भारतात मासेमारीचे उत्पादन वाढेल. असेही मत मंत्री राणे यांनी व्यक्त केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com