Sudhakar Badgujar Politics: सुधाकर बडगुजर यांनी ठाकरेंसमोरच व्यक्त केली खदखद... नव्याने आलेले शहाणपण शिकवतात!

Uddhav Thackeray Internal Party Issues: सुधाकर बडगुजर यांच्या नाराजीचा रोख कोणाकडे... कार्यकर्त्यांत चर्चा.
Sudhakar Badgujar & Sanjay Raut
Sudhakar Badgujar & Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Sudhakar Badgujar Statement: शिवसेनेच्या निर्धार शिबिरात स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती झाल्या. शिवसेना नेते संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नांना या नेत्यांनी उत्तरे दिली. यावेळी उपनेते सुधाकर बडगुजर यांनी व्यक्त केलेल्या भावना चर्चेचा विषय ठरला.

मी शिवसेनेत का? या विषयावर स्थानिक नेत्यांचे मनोगत झाले. शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गीते, उपनेते अद्वय हिरे, शिवाजी ढवळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. खासदार संजय राऊत यांनी त्यांना विविध प्रश्न विचारले.

Sudhakar Badgujar & Sanjay Raut
Aaditya Thackeray Politics: शिवसेना नेते आदित्य ठाकरे बचावले, सत्कार प्रसंगी व्यासपीठ खचले!

यावेळी सुधाकर बडगुजर यांनी शहरात शिवसेनेचा विस्तार करण्यासाठी घेतलेला परिश्रमांची माहिती दिली. राज्यात कोविडचा प्रकोप सुरू असताना आपल्यावर जबाबदारी आली होती. तेव्हा कोणीही घराबाहेर पडत नव्हते. आम्ही कोरोना तपासणी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी घरोघर जाऊन तपासण्या केल्या. त्यामुळे शहरात वातावरण बदलले असा दावा केला.

Sudhakar Badgujar & Sanjay Raut
BJP vs Shivsena UBT : ठाकरेंनी अमित शहांना दिलेलं आव्हान महाजनांच्या जिव्हारी; म्हणाले, "त्यावेळी तुम्ही झोपला होता का?"

श्री बडगुजर म्हणाले, शिवसेनेचा विस्तार व्हावा यासाठी अनेक प्रयोग करून पक्ष वाढवला आहे. नवीन नवीन लोक येतात आणि आम्हाला पक्ष कसा वाढवायचा हे शिकवतात. या नव्याने आलेल्यांनी शिकवलेले शहाणपण पचनी पडत नाही, या शब्दात त्यांनी आपली खदखद व्यक्त केली. पहिल्या रांगेत शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते.

उपनेते बडगुजर यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत झालेले पडद्यामागील राजकारण देखील सांगितले. शिवसेना नेत्यांनी पक्ष सोडून गेलेले विजय करंजकर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र बहुतांश स्थानिक कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा कल वेगळा होता. राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी द्यावी, असे आमचे मत होते. प्रमाणे शिवसेनेचा खासदार देखील निवडून आला. आम्ही शिवसेनेत का? या ऐवजी बडगुजर वेगळ्याच दिशेने चालल्याचे पाहून, खासदार राऊत यांनी हस्तक्षेप करीत मुद्द्यावर बोला, असे त्यांना बजावले.

यावेळी माजी आमदार वसंत गीते यांनी नव्या नेतृत्वाला संधी दिली पाहिजे. युवकांवर नव्या जबाबदाऱ्या टाकण्याची गरज आहे. त्यातून पक्षाला निश्चितच उभारी मिळेल. उपनेते अद्वय हिरे यांनी सध्या सूड भावनेने वागणाऱ्या आणि जनतेची लूट करणाऱ्या विद्यमान राजवटीतून मुक्तता होण्यासाठी दुसरे स्वातंत्र्य युद्ध लढण्याची गरज आहे. कार्यकर्त्यांनी तशी मानसिकता ठेवावी असे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com