Sudhakar Badgujar: सुधाकर बडगुजरांच्या पक्षप्रवेशावरुन नाशिकमध्ये वादाचा भडका; भाजप शहराध्यक्ष म्हणतात,'होय... भाजप वॉशिंग मशीन..'

Sudhakar Badgujar Joing BJP News : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,गिरीश महाजन,कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता.17) सुधाकर बडगुजर यांनी 'भाजपवासी' होत कमळ हाती घेतलं.
Sudhakar Badgujar,Chandrashekhar Bawankule
Sudhakar Badgujar,Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : प्रमुख नेत्यांनी आधी गंभीर आरोप केलेले,चौकशीच्या ससेमिरा पाठीमागे लागलेल्या अशा अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.या प्रवेशानंतर त्यांच्याविरोधातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी बंद होतात.आणि तपास यंत्रणांच्या चौकशीही अचानकपणे थांबली जाते. याचमुळे विरोधकांकडून सातत्यानं भाजप हा वॉशिंग मशीन असून भ्रष्टाचारी नेते तिथे स्वच्छ होतात अशी टीका केली जाते. पण याचवेळी आता भाजपच्या नाशिक शहराध्यक्षाच्या विधानानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर नाशिकच्या राजकारणातील प्रमुख नाव असलेल सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्या पक्षप्रवेशाच्या आधीच काही वेळ सोशल मीडियावर एक पोस्ट चर्चेत आली आहे. नाशिकचे भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी होय..भाजप वॉशिंग मशिन असल्याचं विधान केलं आहे.यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

केदार म्हणाले, होय...भाजप वॉशिंग मशिन आहे.इतर राजकीय पक्षांमधून भाजपात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे.भाजपाचे प्राथमिक सदस्य होण्यास काहीही अटी शर्ती नाही.त्याकरिता मो.नं.8800002024 डायल करून ऑनलाईन पद्धतीने देशातील कोणालाही भाजपचे प्राथमिक सदस्य होता येते. तथापि भाजपची कार्यपद्धती पाहता जे-जे पक्षात येतील त्यांच्या कोणत्याही अटी शर्ती नसतील,असंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

एकीकडे नाशिकच्या राजकारणातलं मोठं प्रस्थ असलेल्या सुधाकर बडगुजर यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अचानक भेट घेतल्यानं तेव्हापासूनच त्यांच्या भाजप (BJP) प्रवेशाच्या चर्चा जोर धरू लागल्या होत्या.

Sudhakar Badgujar,Chandrashekhar Bawankule
Sharad Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? चर्चेचे शरद पवारांनी केले एका घावात दोन तुकडे

सुरुवातीला त्यांची ही भेट विकासकामांसंदर्भात असल्याचे बोलले जात होते.पण त्यानंतर मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून त्यांच्या या भेटीवर संतप्त प्रतिक्रिया तर आलीच शिवाय त्यांची पक्षातून हकालपट्टीही करण्यात आली.

यानंतर बडगुजरांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर त्यांच्या प्रवेशाला झालेला विरोध डावलून बडगुजर हे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,गिरीश महाजन,कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता.17) भाजपवासी होत कमळ हाती घेतलं. मात्र,या भेटीनंतर भाजपचे नाशिक शहराध्यक्ष यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केल्यानं सुधाकर बडगुजरांच्या पक्षप्रवेशाआधीच भाजपमध्ये फटाके फटाके फोडण्यास सुरुवात झाली की काय अशी चर्चा रंगू लागली आहे.

कारण एकीकडे बडगुजर आपल्या समर्थक आणि कार्यकर्त्यांसह मुंबईला भाजप प्रवेशासाठी रवाना झाले असतानाच तिकडे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्याला पक्ष प्रवेशाबाबत कोणतीही माहिती नाही असं स्पष्ट केल्यानं एकच गोंधळ निर्माण झाला होता. याचवेळी भाजपच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी बडगुजरांच्या पक्षप्रवेशाला कडाडून विरोध दर्शवला आहे. भाजपमधील नाराजवर खुद्द बावनकुळेंनी ही भाष्य केलं आहे.

Sudhakar Badgujar,Chandrashekhar Bawankule
Imtiaz Jaleel on Devendra Fadnavis : '3 हजार 200 कोटींची देशातली एकमेव वाॅटर स्किम'; इम्तियाज जलीलांचा नागपूर घेऊन जाण्याचा सल्ला अन् फडणवीस भडकले...

याच पार्श्वभूमीवर नाशिकचे भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या पोस्टनं खळबळ उडवली आहे. या पोस्टमध्ये ते म्हणतात,होय.भाजप वॉशिंग मशिन आहे. इतर राजकीय पक्षांमधुन भाजपात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. भाजपाचे प्राथमिक सदस्य होण्यास काहीही अटी शर्ती नाही. त्याकरिता मो.नं.8800002024 डायल करून ऑनलाईन पद्धतीने देशातील कोणालाही भाजपचे प्राथमिक सदस्य होता येते.

तथापि भाजपची कार्यपद्धती पहाता जे-जे पक्षात येतील त्यांच्या कोणत्याही अटी शर्ती नसतील. त्यांना भाजपची कार्यपद्धती, ध्येय धोरणे अंगिकारावीच लागतील. तरच ते भाजपात येतील. इतिहास साक्षी आहे की वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी होऊ शकतो. त्यानुसार वॉशिंग मशीनचा अर्थच असा आहे की त्यांनी मागचा इतिहास सोडुन भाजपची कार्यपद्धती अंगिकारली पाहिजे. त्याप्रमाणे जर भाजप करत असेल तर काय हरकत आहे.

शेवटी लोकशाही पध्दतीच्या राजकारणात डोक्याला जितके महत्त्व आहे तितकेच महत्व त्या पक्षात डोके किती संख्येने जास्त आहेत ते पण तितकेच महत्वाचे आहे.तत्कालीन पंतप्रधान श्रद्धेय भारत रत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार विश्वासदर्शक ठरावात एका मताने पडले होते.त्यानंतर पंतप्रधान पदाच्या पदावर संगीत खुर्चीचा खेळ सुरु झाला होता.

त्यामुळे देशाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे भाजपात कोणी येत असेल व पक्षाची रचना व कार्यपद्धती अंगिकारत असेल तर काय हरकत आहे, असं सुनील केदार यांनी म्हटलं आहे.

Sudhakar Badgujar,Chandrashekhar Bawankule
Sudhakar Badgujar : बडगुजरांच्या प्रवेशाबाबत मुंबईतून मध्य रात्रीच आला आदेश, नाशिकमध्ये फोन खणाणला, नक्की काय घडलं?

कोण आहेत सुधाकर बडगुजर?

राज्यसभा खासदार संजय राऊत यांचे कट्टर समर्थक असलेल्या सुधाकर बडगुजरांचा 14 जून 2008 शिवसेनेत प्रवेश झाला होता. त्यांनी 2007 पासून सुधाकर बडगुजर यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत बडगुजरांनी नाशिकच्या राजकारणात चांगलंच बस्तान बसवलं होतं. महापौर निवडणुकीतही त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com