Sudhakar-Badgujar-Uddhav-Thackrey-Vilas-Shinde.jpg
Sudhakar-Badgujar-Uddhav-Thackrey-Vilas-Shinde.jpgSarkarnama

Shivsena UBT Politics: देवेंद्र फडणवीस यांना भेटलेल्या सुधाकर बडगुजर यांची शिवसेनेतून तडकाफडकी हकालपट्टी

Sudhakar Badgujar: Shivsena UBT finally expels deputy leader Sudhakar Badgujar -शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला मोठा निर्णय, उपनेते सुधाकर बडगुजर पक्षातून बडतर्फ
Published on

Shivsena UBT News: गेले दोन दिवस चर्चेचा विषय असलेल्या शिवसेना उपनेते सुधाकर बडगुजर यांच्यावर आज पक्षाने कारवाईचा आसूड ओढला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बडगुजर यांना पक्षातून तडकाफडकी बडतर्फ केले आहे. या निर्णयाने शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे.

आज सकाळी शिवसेना पक्षनेते संजय राऊत यांनी या विषयावर बोलणे टाळले होते. सुधाकर बडगुजर गेले दोन दिवस सातत्याने पक्षाला अप्रत्यक्ष इशारा देत होते. त्यामुळे पत्रकार परिषदेत राऊत यांनी या विषयावर भाष्य करणे टाळले होते. त्यानंतर राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निर्णय नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना कळवला.

मुंबईत पत्रकार परिषद झाल्यानंतर संजय राऊत यांनी तातडीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याचे कळते. नंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बडगुजर यांची तात्काळ हकालपट्टी केली आहे. श्री. बडगुजर यांनी अन्य पक्षात जाण्याचा निर्णय होण्याआधीच त्यांना हा मोठा राजकीय सेटबॅक बसला आहे. हा पक्षाच्या अन्य पदाधिकाऱ्यांनाही इशारा मानला जातो.

Sudhakar-Badgujar-Uddhav-Thackrey-Vilas-Shinde.jpg
Sanjay Raut Politics: संजय राऊत यांचा गौप्यस्फोट; अभिषेक कौल महाजन यांचा दलाल, ३५० फाईल्स दाबल्या!

श्री. बडगुजर यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करताना घेतलेले निर्णय आणि कामकाज यामुळे माझ्यासह दहा ते बारा जण नाराज असल्याचे म्हटले होते. त्याची प्रतिक्रिया आज तातडीने उमटली. पक्षाचे जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेऊन बडगुजर यांच्यावर टीकास्त्र सोडले. आपली नियुक्ती पक्षाने केली आहे. पक्षाच्या आदेशाप्रमाणे आपण कामकाज करणार आहोत. आपल्या नियुक्तीने कोणीही नाराज नसल्याचा दावा सूर्यवंशी यांनी केला.

यावेळी जिल्हाप्रमुख सूर्यवंशी यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले. गिरीश महाजन यांनी आठ दिवसात शिवसेना संपेल असे बरळले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष संपवावा एवढी ताकद महाजन यांची निश्चितच नाही. असेना हा लाखो शिवसैनिक आणि मराठी माणसांचा पक्ष आहे, याची जाणीव लवकरच महाजन यांना करून देऊ असे सूर्यवंशी म्हणाले.

नाशिकला होणाऱ्या कुंभमेळ्यात गिरीश महाजन यांना प्रचंड पैसे खायचे आहेत. हजारो कोटींचा भ्रष्टाचार करण्यासाठी ते अन्य कोणाला पालकमंत्री होऊ देत नाहीत. मात्र शिवसेना ठाकरे पक्ष यापुढे नाशिक शहरातील प्रत्येक कामावर लक्ष ठेवेल. महापालिका तसेच सिंहस्थ कुंभमेळ्यात होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आक्रमक भूमिका घेऊन आवाज उठवू असा इशारा त्यांनी दिला.

श्री. बडगुजर यावेळी पक्ष कार्यालयात उपस्थित नव्हते. महानगर प्रमुख विलास शिंदे यावेळी उपस्थित होते. शिंदे यांनी बडगुजर यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले. आपल्या घरी विवाह समारंभ असल्याने एक महिना पक्षकार्यातून सुट्टी घेत असल्याची परवानगी वरिष्ठ नेत्यांकडून घेतली होती. आपण अद्यापही शिवसेनेतच असून स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका विषद करू, असे ते म्हणाले.

--------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com