Sudhakar Badgujar
Sudhakar BadgujarSarkarnama

Sudhakar Badgujar : नाव मोठं लक्षण खोटं, बडगुजरांच्या घरातच ठाकरे गटाला धक्का!

Shivsena UBT Politics : जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना भाजपने लोकसभेच्या निवडणुकीत धूळ चारली.
Published on

Sudhakar Badgujar News: लोकसभा निकालाचे कवित्व अद्याप संपलेले नाही. नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाने शिंदे गटाला धूळ चारली. मात्र, यामध्ये जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या मतदारसंघातच शिवसेना ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना जबरदस्त पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र शिवसेनेचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी प्रचाराची धुरा खांद्यावर घेतलेल्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात गोडसे यांना मोठी आघाडी मिळाली आहे. त्यामुळे बडगुजर यांची कार्यपद्धती आणि जनतेतील स्थान दोन्हीविषयी शंका निर्माण केली जात आहे.

नाशिक पश्चिम मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना 93 हजार 617 मते मिळाली आहेत. शिंदे गटाचे खासदार गोडसे यांना येथून एक लाख चोवीस हजार 827 मते मिळाली. त्यामुळे त्यांना 31 हजार 210 मतांची आघाडी होती. बडगुजर हे या मतदारसंघातून विधानसभेचे संभाव्य उमेदवार मानले जातात. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला हा अनपेक्षित धक्का आहे.

बडगुजर हे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांच्या कामात अन्य कोणालाही हस्तक्षेप करता येत नाही. निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी महिनाभर पक्ष विरोधी अडाखे बांधण्यात व्यस्त होते. मात्र स्थानिक नेतृत्वाच्या स्पर्धेमुळे श्री बडगुजर त्यांना रोखू शकले नव्हते त्यामुळे अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये बडगुजर यांच्या कार्यशैलीबद्दल नाराजीचे भावना होती असे बोलले जाते.

या मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे या आमदार आहेत. शिंदे गटाचे देखील विविध पदाधिकारी आणि महानगर प्रमुख बंटी तीदमे येथे सक्रिय आहेत. बडगुजर आणि भाजपच्या आमदार हिरे यांच्यात आगामी विधानसभा निवडणुकीत लढत होण्याची शक्यता आहे. या लढतीची पूर्व चाचणी म्हणून लोकसभा निवडणुकीकडे पाहिले जाते. यामध्ये भाजपपुढे बडगुजर यांची चांगलीच पीछेहाट झाली आहे. शिवसेनेसाठी ती मानहानीकारक म्हणता येईल.

Sudhakar Badgujar
Sharad Pawar Politics : राष्ट्रवादीचे अधिवेशन नगरला मात्र कौतुक झाले नाशिकचे; हे आहे कारण....

या मतदारसंघातील खानदेश फॅक्टर महत्त्वाचा मानला जातो. सातपूर आणि शहरासह काही भागात त्याचा चांगला प्रभाव आहे. आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या इच्छुक उमेदवारांमध्ये उत्साह आहे. त्याच्यामुळे लोकसभा निवडणुकीत मिळालेले मताधिक्य हे कारण मानले जाते. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला नेत्यांच्या घरातच पीछेहाट झाल्याने हा धोक्याचा इशारा मानला जातो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com