Sudheer Mungentiwar Politics: मुनगंटीवार म्हणतात, पालकमंत्री नाही म्हणून काय?, नाशिकला तीन मंत्री आहेत ना!

Sudheer Mungantivar; There should be a guardian minister, but what if he does something wrong?-भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पालकमंत्र्यांनी चुकीचे काम केले तर काय? असा प्रश्न केला.
Sudhir-Mungantiwar.jpg
Sudhir-Mungantiwar.jpgSarkarnama
Published on
Updated on

Sudheer Mungantiwar News: नाशिकच्या पालकमंत्री पदाचा राजकीय तिढा दिवसेंदिवस क्लिष्ट होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील हा प्रश्न थेट दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. मात्र अद्यापही त्यावर तोडगा निघू शकला नाही.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत मतप्रदर्शन केले आहे. नाशिकला पालकमंत्री नाही, तो असायलाच हवा. मात्र पालकमंत्री नाहीत म्हणून फार फरक पडत नाही. जिल्ह्याला तीन मंत्री आहेत. ते सर्व सक्षम आहेत. त्यामुळे ते आपल्या पूर्ण क्षमतेने काम करीत असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.https://www.sarkarnama.in/topic/nashik

Sudhir-Mungantiwar.jpg
Sudhir Mungantiwar : "माझ्या प्रमोशनसाठी सरकार टिकलं पाहिजे, पण..."; प्रणिती शिंदे, अरविंद सावंतांचा उल्लेख करत मुनगंटीवारांचं मोठं वक्तव्य

नाशिक जिल्ह्याला पालकमंत्री नाही, हा या जिल्ह्याचा अपमान नाही का? या प्रश्नावर गुणगंटीवार म्हणाले, असे होत नसते. पालकमंत्री नियुक्त केल्यावर त्याने चुकीचे काम केले तर नाशिककरांचा अपमान होईल. त्यामुळे या विषयावर राज्य शासन लवकरच आपली भूमिका आणि निर्णय घेईल.

Sudhir-Mungantiwar.jpg
NCP Sharad Pawar: नियुक्ती होताच जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील यांचा सरकारला इशारा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावीच लागेल!

अलीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य करण्यात आली. यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त झाली. विविध सामाजिक संस्थांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. नागपूर येथील श्री कोरटकर याला अटक देखील करण्यात आली.

यावर मुनगंटीवार यांनी असे प्रकार होणे अयोग्य आहे, असे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज आपल्याला लोकशाही प्रणाली दिसते आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्यांना कोणीच सहन करणार नाही. याची जाणीव सबंध महाराष्ट्राला आहे. असे प्रकार होऊ नये यासाठी कायद्यात देखील दुरुस्तीचा पर्याय उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई साखळी बॉम्बस्फोट हल्ल्यातील मुख्य संशयित तहव्वूर राणा याचे भारताला प्रत्यार्पण करण्यात आले आहे. त्यामुळे विरोधकांकडून आता दाऊद इब्राहिमला भारतात आणण्याच्या घोषणाचे काय झाले? अशी विचारणा होत आहे. त्यावर मुनगंटीवार यांनी विरोधक सत्तेत असताना त्यांनी असे कोणतेही प्रयत्न केलेले नाही. भाजपने राणाला भारतात आणले आहे. पुढील तपासून कायदेशीर प्रक्रियेद्वारे कारवाई केली जाईल असे सांगितले.

--------

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com