Maharashtra Political Crisis : सुधीर मुनगंटीवरांचा संजय राऊतांना टोला; म्हणाले, "राऊतांचा डीएनए..."

Shiv Sena SC Hearing : कायद्याला धरून निकाल लागण्याची राऊतांनी व्यक्त केली अपेक्षा
Sanjay Raut, Sudhir Mungantiwar
Sanjay Raut, Sudhir MungantiwarSarkarnama

Sudhir Mungantiwar : राज्यात कोणताही संघर्ष नाही, कोणतेही आमदार अपात्र होणार नाहीत, त्यामुळे 'मुंगेरीलाल के हसीन सपने'चा डीएनए असणारे नेते राज्यात आहेत, असा टोला राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खासदार संजय राऊत यांना नाव न घेता लगावला आहे.

Sanjay Raut, Sudhir Mungantiwar
Supreme Court Hearing: सत्तासंघर्षाच्या निकालाआधीच फडणवीसांचं मोठं भाष्य; एकनाथ शिंदेंबाबत म्हणाले...

मंत्री मुनगंटीवार आमदार लता चंद्रकांत सोनवणे यांच्या कन्या डॉ. अमृता यांच्या विवाह सोहळ्यासाठी बुधवारी (१०) जळगाव येथे आले होते. यावेळी त्यांना पत्रकारांनी गुरुवारी (११) लागणाऱ्या सत्तासंघर्षांच्या निकालाबाबत प्रश्न विचारले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील सरकार पडणार असे मत शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केले आहे. त्यावर मुनगंटीवार म्हणाले, "मुंगेरीलाल के हसीन सपने यांचे 'डीएनए' असणारे काही नेते आजही आहेत, असे दिसत आहे. कोणतेही आमदार अपात्र होत नाहीत. त्यामुळे सत्ता जाण्याचा प्रश्‍न येतच नाही."

Sanjay Raut, Sudhir Mungantiwar
Nana Patole : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात 16 आमदार बाद होणार ; नाना पटोलेंचा दावा

सत्तासंघर्षाबाबत मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले, "राज्यात कोणताही सत्तासंघर्ष नाही. सत्तासंघर्ष असता तर आम्ही या कार्यक्रमाला दिसलो असतो का? सत्तेचे गणित साधे आहे. सर्वोच्च न्यायालयात कोणत्या मॅटरवर केस आहे, असे अपात्र करता येत नाही, म्हणून हा प्रश्‍न उपस्थित होत नाही. सत्याचाच विजय होत असतो. उद्या सत्याचाच विजय होईल. काही लोक हवा पसरविण्याचा प्रयत्न करतात. मायावी विचार मांडतात, गैरसमज निर्माण करतात. पण मी सांगतो काहीही सत्तासंघर्ष नाही. आम्ही जनतेच्या विचारांनी काम करीत आहोत आणि उद्याही काम करीत राहणार."

Sanjay Raut, Sudhir Mungantiwar
NCP News : 'अजितदादा जेव्हा पहिल्यांदा निवडून आले तेव्हा श्रीकांत शिंदे डायपरमध्ये..' ; राष्ट्रवादीच्या नेत्याची बोचरी टीका !

दरम्यान, सत्तासंघर्षाबाबत खासदार संजय राऊत यांनी सावध भूमिका घेतली आहे. राऊत म्हणाले, "आम्ही असे म्हणणार नाही की सत्तासंघर्षाचा निकाल आमच्या बाजूने लागणार आहे. हा देशाचा निकाल आहे. या देशाच्या स्वातंत्र्याचा, राज्य घटनेचा विजय होईल. न्यायपालिकेवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. निकाल कायद्याला अनुसरुन आला नाही तर आपली अवस्था पाकिस्तानप्रमाणे होईल. सध्या पाकिस्तानात सुरु आहे, तेच आपल्याकडे सुरु होईल. पाकिस्तानात कायद्याची तोडमोड होत आहे. विरोधकांना अटक केली जात आहे."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com