MLA Suhas Kande : राजकारणात शब्दाला किंमत! एकमेव नगरसेवक असूनही भाजपसाठी सुहास कांदेंचा मोठा निर्णय

Manmad municipal : मनमाड नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेने भाजपसोबत युती केली होती. भाजपचा एकच नगरसेवक निवडून आला. मात्र तरीही या ठिकाणी आमदार सुहास कांदे यांनी युती धर्म पाळला आहे.
Suhas Kande, Girish Mahajan
Suhas Kande, Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : मनमाड नगरपरिषद निवडणुकीत भाजपसोबत युती करण्यासाठी शिवसेनेकडून आमदार सुहास कांदे व राष्ट्रवादीकडून समीर भुजबळ या दोघांनी फील्डींग लावली होती. परंतु अखेरीस भाजपने येथे सुहास कांदे यांना साथ देत शिवसेनेसोबत युती केली होती. मनमाड नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला. सुहास कांदे यांचे समर्थक योगेश पाटील नगराध्यक्ष झाले.

भाजपला दिलेला शब्द पाळत व युती धर्माचे पालन करत आमदार कांदे यांनी भाजपसाठी मोठा निर्णय घेतला आहे. मनमाड नगरपरिषद निवडणुकीत भाजपचा एकमेव नगरसेवक असतानाही आमदार कांदे यांनी भाजपला उपनगराध्यक्षपद दिले आहे. उपनगराध्यक्षपदी भाजपचे मुकुंद एळींजे तर स्वीकृत नगरसेवकपदी शिवसेनेचे शहरप्रमुख मयूर बोरसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

मनमाड नगरपरिषदेच्या निवडणुकीत नांदगावप्रमाणेच सुहास कांदे यांनी त्यांचे वर्चस्व दाखवून दिले. शिवसेनेच्या तब्बल २१ जागा त्यांनी निवडून आणल्या. त्यात भाजपचा १ व रिपाईचे २ असे सुरुवातील २४ नगरसेवक कांदे गटाकडे होते. दरम्यान काँग्रेसच्या एका व एका अपक्ष नगरसेवकाने शिवसेनेत प्रवेश केल्याने सत्ताधारी कांदे गटाचे संख्याबळ २६ झाले आहे.

Suhas Kande, Girish Mahajan
Nashik NMC Election : नाशिक पोलिस आयुक्तांचे चोख नियोजन, 'काही अनुचित घडलं तर अवघ्या 'पाच' मिनिटांत पोहोचणार फोर्स

दरम्यान विरोधी बाकांवरील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ४ व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा केवळ १ नगरसेवक आहे. सुहास कांदे यांनी या निवडणुकीत विरोधकांचा पुरता धुव्वा उडवलेला दिसतो. समीर भुजबळ यांचे भाजपसोबत युती करण्याचे प्रयत्न सुरु असतानाच दुसरीकडे कांदे यांनी जादूची कांडी फिरवत भाजपसोबत युतीची घोषणाही करुन टाकली होती. भाजपला सोबत घेऊन कांदेंनी नगरपालिकेवर शिवसेनेचा फगवा फडकवला.

Suhas Kande, Girish Mahajan
Nashik Election : अजितदादांच्या उमेदवाराची कार फोडली, मतदानाच्या आदल्यादिवशी नाशिकमध्ये राडा.. आज पोलिसांचा कडक बंदोबस्त

या निवडणुकीत भाजपचा केवळ एकच नगरसेवक निवडून आला. प्रभाग क्रमांक ४ अ मधील अनुसूचित जातीसाठी राखीव जागेवरून निवडून आलेले भाजपचे एकमेव नगरसेवक मुकुंद एळींजे आहेत. बौद्ध समाजातील नवखा चेहरा असलेले मुकुंद एळींजे पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आले असून, पहिल्याच टर्ममध्ये त्यांना आमदार कांदे यांनी उपनगराध्यक्षपदाची संधी दिली. नगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झालेल्या विशेष सभेत उपनगराध्यक्षपदासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल झालेल्या एकमेव नामनिर्देशन अर्जानुसार भाजपचे मुकुंद एळींजे यांची निवड जाहीर करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com