Maratha Reservation: सुजात आंबेडकरदेखील म्हणाले, मी तुमच्या बरोबर!

Sujat Ambedkar Question : वंचित बहुजन युवा आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी नाशिकच्या दौऱ्यात भाजपचे चांगलेच वाभाडे काढले.
Sujat Ambedkar
Sujat AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Sujat Ambedkar News : मराठा आरक्षणाच्या आंदोलनप्रसंगी राज्यभर गावोगावी राजकीय नेत्यांना गावबंदी होत होती, तेव्हा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांचे मराठा आंदोलकांकडून स्वागत होत होते. त्याचा अनुभव युवा नेते सुजात आंबेडकर यांच्याबाबतदेखील आला. (Sujat Ambedkar supports Maratha reservation agitation)

वंचित बहुजन युवा आघाडीचे (Adv. Prakash Ambedkar) नेते सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत काल नाशिकमध्ये (Nashik) राज्य सरकारच्या (Maharashtra Government) कंत्राटीकरणाच्या धोरणाविरोधात मोर्चा काढण्यात आला. या वेळी त्यांनी मराठा आंदोलकांना (Maratha Reservation) पाठिंबा दिला.

Sujat Ambedkar
Maharashtra Politics : मराठवाड्याचे पाणी अडवण्यासाठी अमृता पवारही आल्या पुढे!

नाशिक शहरात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या आवारात गेल्या ५८ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून साखळी उपोषण सुरू आहे. मोर्चा संपल्यावर सुजात आंबेडकर यांनी या मराठा आंदोलकांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. या वेळी त्यांनी तुमच्या मागण्यांसाठी आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहू असे आश्वासन दिले. त्याचे आंदोलकांनी स्वागत केले.

या दौऱ्यात आंबेडकर यांनी भारतीय जनता पक्ष तसेच राज्य सरकारच्या वर्तनावर नेमके बोट ठेवले. ते म्हणाले एकीकडे राज्यात आरक्षणाच्या धोरणावरून जनतेत प्रचंड अस्वस्थता आहे. लोक नाराज आहे. सरकार त्याबाबत नेमेक काम न करता जनतेला झुलवत ठेवत आहे. दुसरीकडे खासगीकरणाचे धोरण जोरात राबवत आहे. हे सर्व आरक्षणाच्या धोरणाच्या नेमके विरोधात आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन हे घातक धोरण रोखले पाहिजे.

त्यांनी भाजपवर अतिशय गंभीर टीका केली. ते म्हणाले, जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्ष सत्तेत असतो, तेव्हा जाती, जातीत भांडणे लावली जातात. सध्याच्या सरकारमध्ये तर भाजपने सर्व तत्त्व, साधन सुचिता गुंडाळून ठेऊन इकडचे, तिकडचे लोक एकत्र करून सरकार चालविण्याचे काम सुरू ठेवले आहे. हे कुठल्याच नैतिकतेत बसत नाही, जनतेला ते पंसत पडलेले नाही.

Sujat Ambedkar
Balasaheb Thorat: दिवाळीत थोरातांनी अजितदादांवर टाकला 'बॉम्ब'; मोदींच्या आरोपानंतर सगळं कसं शांत?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com