Rajendra Phalke On Radhakrishna Vikhe : बुंदीचे लाडू वाटले, 'राष्ट्रवादी'ने विखेंच्या पराभवावर मीठ चोळले

Ahmednagar Lok Sabha Election 2024 Result : राधाकृष्ण विखे यांना पराभव पचवता येईल की नाही, हा प्रश्न आहे. मात्र यापुढे त्यानी सामान्यांना त्रास देऊ नये. ते कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार महाविकास आघाडीचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांना आहे.
Rajendra Phalke Radhakrishna Vikhe
Rajendra Phalke Radhakrishna Vikhesarkarnama

Ahmednagar Lok Sabha Election 2024 News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी बुंदीचे लाडू वाटत नीलेश लंके यांच्या विजयाचे सोपे गणित सांगितले. भाजपमधील नेते विखेंच्या त्रासाला कंटाळल्याने लंके यांना मोठी मदत झाली, असा गौप्यस्फोट राजेंद्र फाळके यांनी केला. देवेंद्र फडणवीस मंत्रीपदाचा सोडण्याची तयारी केली आहे. तशीच मंत्री विखे यांनी नैतिकता दाखवावी, असा सल्ला देखील राजेंद्र फाळके यांनी दिला.

नगर दक्षिणचा विजय खेचून आणल्यानंतर राजेंद्र फाळके यांनी पत्रकार परिषद घेत, भाजपचे चांगलेच सुनावले. सामान्यांना त्रास देण्याचे काम पालकमंत्र्यांनी केले. त्याला साथ त्यांच्या पुत्रानी दिली.

आम्ही अतिक्रणांच्या विरोधातच आहोत मात्र सुप्यासारखी अतिक्रमणे जिल्हाभरात आहेत व त्यांना ती दिसली नाहीत. सुपे येथे खुनशी प्रवृत्ती आणि सूडबुद्धीने कारवाई झाली. सामान्यांना त्रास दिल्यावर त्यांच्यातून उद्रेक होतो, हे भाजपच्या काही जणांनी दाखवून दिले आहे व त्यांनी लंके याना साथ दिली आहे, असा दावा करून फाळके यांनी केला.

विखेंच्या राजीनाम्यावर थोरात भाष्य करतील

आम्ही विजयाने हुरळून जाणार नाही. पण त्यांना पराभव पचवता येईल की नाही, हा प्रश्न आहे. मात्र यापुढे त्यानी सामान्यांना त्रास देऊ नये. ते कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार महाविकास आघाडी आणि काँग्रेस (Congress) नेते आमदार बाळासाहेब थोरात यांना आहे. ते त्यावर भाष्य करतील. पण फडणवीस यांच्यासारखी शिस्त आणि नैतिकता पालकमंत्री विखे दाखवतील का? असा सवाल फाळके यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rajendra Phalke Radhakrishna Vikhe
Sujay Vikhe V/S BJP : जगताप-कर्डिले-कोतकर ताकदीचा 'खेळ' विखेंना नडला? भाजप निष्ठावंत आणि'विखे यंत्रणे'त जुंपली?

ती 40 हजार मते लंके यांचीच

तुतारीशी साधर्म्य असलेले पिपाणी चिन्ह मिळालेल्या उमेदवाराला 44 हजार 500 मते मिळाली आहेत. 17 पेक्षा जास्त उमेदवार असल्याने दोन ईव्हीएम मशीन होते. पहिल्या ईव्हीएमच्या दुसऱ्या क्रमांकावर लंके यांचे नाव होते तर दुसऱ्या ईव्हीएमच्या दुसऱ्या क्रमांकावर तुतारी साधर्म्य असलेले चिन्ह असलेल्या उमेदवाराचे नाव होते. त्याला कोणीही ओळखत नाही. त्यामुळे त्याला मिळालेल्या मतांपैकी किमान 40 हजार मते लंके यांची आहेत, असा दावाही फाळके यांनी केला.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शहर प्रमुख संभाजी कदम, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह शौकत तांबोळी, प्रताप शेळके, अशोक बाबर, बाळासाहेब हराळ, संदेश कार्ले, बाळासाहेब बोराटे, प्रा. सिताराम काकडे, आम आदमी पक्षाचे राजू आघाव, किसनराव लोटके, विलास उबाळे, दत्ता जाधव, विक्रम राठोड, अभिषेक कळमकर, योगीराज गाडे उपस्थित होते.

Rajendra Phalke Radhakrishna Vikhe
Balasaheb Thorat On Radhakrishna Vikhe : विखेंसोबत छत्तीसचा आकडा; बाळासाहेबांनी सेलिब्रेशनात जिलेबी वाटली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com