Sujay Vikhe vs Ram Shinde : पिसाळांच्या धोंडे जेवणात विखे, शिंदेंची जुगलबंदी !

Sujay Vikhe vs Ambadas Pisal : नेत्यांमध्ये जोरदार राजकीय फटकेबाजी.
Sujay vikhe , Ambadas Pisal, Ram Shinde
Sujay vikhe , Ambadas Pisal, Ram ShindeSarkarnama
Published on
Updated on

राजेंद्र त्रिमुखे

Ahmadnagar News : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार सुजय विखे यांची राजकीय वक्तव्य करण्याची अनोखी पद्धत आहे. सावध आणि सूचक वक्तव्य करताना राजकीय गूढ निर्माण करण्यात ते वाकबगार आहेत. राजकीय विरोधकांवरच नव्हे तर स्वःपक्षीय नेत्यांच्या अनुषंगाने त्यांची वक्तव्ये अनेकांना बुचकाळ्यात पाडणारी असतात. 'मी माझ्या नावापुढे कधीही भावी शब्द लावत नाही, कारण मी आजी (विद्यमान) खासदार आहे', हे त्यांनी एका कार्यक्रमात आवर्जून सांगितले.

Sujay vikhe , Ambadas Pisal, Ram Shinde
Mahadev Jankar On Pankaja Munde : पंकजाताईंना साडीचोळी घेऊन त्यांना आणायला जाईन ! असं का म्हणाले महादेव जानकर ?

जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आणि भाजपचे जेष्ठ नेते अंबादास पिसाळ यांच्या वाढदिवसांनिमित्ताने कार्यकर्त्यांनी जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात पिसाळ यांनी सर्वच राजकीय पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना गोड जेवण खाऊ घातले. या निमित्ताने उपस्थित असलेले खासदार सुजय विखे ,आमदार राम शिंदे, माजीमंत्री शिवाजीराव कर्डीले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांची जोरदार राजकीय फटकेबाजी दिसून आली.

Sujay vikhe , Ambadas Pisal, Ram Shinde
Narendra Modi On INDIA Alliance : इंडियन मुजाहिद्दीन - ईस्ट इंडिया कंपनीच्या नावातही 'INDIA'; विरोधकांवर पंतप्रधानांची बोचरी टीका!

या कार्यक्रमात केंद्रबिंदु विषय ठरला तो म्हणजे भाजपच्या दृष्टीने कर्जत-जामखेड विधानसभा आणि त्याला जोडून अहमदनगर दक्षिण लोकसभा उमेदवारी. राम शिंदे यांनी 2024साठी भाजप श्रेष्ठींकडे जाहीर लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगितले. सद्यपरिस्थितीत सुजय विखे, शिंदे यांच्या राजकीय वक्तव्यांकडे जिल्ह्याचे आणि विशेष करून भाजपंतर्गत नेत्यांचे जास्त लक्ष लागून राहिले आहे. अशात धोंड्याच्या महिन्यात पिसाळांनी आयोजित केलेला धोंडा कोणत्या 'जावया'साठी होता अशीही मार्मिक चर्चा सध्या सुरु आहे.

Sujay vikhe , Ambadas Pisal, Ram Shinde
Varsha Thakur IAS Officer : जाणून घ्या, लातूरच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांच्याबद्दल ?

सुजय विखे यांनी,"पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnvis) यांच्या कामाचे कौतुक केले. या कार्यक्रमात बोलतांना,"पक्ष श्रेष्ठी जो आदेश देतील त्यांसाठी आपण काम करू, आपण आपल्या नावापुढे भावी खासदार लावत नाही कारण आपण आजी खासदार असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले". "उमेदवारी वरून कसलाही वाद नसल्याचे सांगत उमेदवारासाठी इतरांची इच्छा असू शकते. मात्र, याबाबत पक्षश्रेष्ठीं निर्णय घेतात. त्यामुळे पक्षश्रेष्ठी आदेश देतील त्यापद्धतीने सर्व काही होईल आणि त्यांचे काम करू", असेही विखे ( Sujay Vikhe ) म्हणाले. अंबादास पिसाळ यांच्या बाबतीत पिसाळांचा जनसंपर्क ही जमेची बाजू आहे. मात्र, त्यांनी निवृत्तीचा विचार करावा,असे कोड्यात टाकणारे सूचक वक्तव्य विखे यांनी यावेळी बोलतांना केले.

Sujay vikhe , Ambadas Pisal, Ram Shinde
Assembly Monsoon Session : बाळासाहेब थोरातांचे भुजबळ-भुसेंना चिमटे; ‘तिकडं गेल्यामुळे गप्प बसले, नाहीतर आपण आरडाओरडा केला असता’

"मी पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. सर्वांच्याच मनात महत्वकांक्षा आणि स्वप्ने असतात", असे प्रत्त्युतर अंबादास पिसाळ यांनी यावेळी दिले. राम शिंदे ( Ram Shinde ) यांनी पिसाळ यांच्या वक्तव्यावर बोलतांना चांगलीच टीका केली. "भाजप ( BJP) प्रामाणिक आणि निष्ठवंतांना योग्य वेळी संधी देते',असे म्हणत पिसाळ यांना शुभेच्छा दिल्या. एकूणच कर्जत-जामखेड विधानसभा आणि नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपंतर्गत उमेदवारीचे वलय या कार्यक्रमास आणि नेत्यांच्या वक्तव्यात असले तरी पक्ष देईल तो आदेश मान्य करू असेही सांगण्यास इच्छुक नेतेमंडळी विसरली नाहीत हे विशेष.

Edited By : Rashmi Mane

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com