Sujay Vikhe-Patil News: सुजय विखेंचा भलताच कॉन्फिडन्स; म्हणाले, लोकसभेला प्रतिस्पर्धी कोण याचा विचार करत नाही

Maharashtra Politics : ''आगामी निवडणुकीतील माझे भवितव्य कोणी ठरवू शकत नाही, पुढील खासदार हा जनताच ठरवेल...''
Dr. Sujay Vikhe Patil
Dr. Sujay Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar : ''अहमदनगर जिल्ह्याचा विकास करणं हेच माझं ध्येय आहे. माझ्या कुटुंबाने देखील पन्नास वर्षे जे जपलं तेच पुढे घेऊन जाण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीतील माझे भवितव्य कोणी ठरवू शकत नाही. पुढील खासदार हा जिल्ह्यातील जनताच ठरवेल'', असं खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले. त्यामुळे त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीबाबत भलताच कॉन्फिडन्स असल्याचं दिसून येत आहे.

''तसेच आगामी लोकसभा निवडणुकीबाबत माझा प्रतिस्पर्धी कोण आहे? कोण उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहे? याचा मी कधीही विचार केलेला नाही. कारण खासदारकीवर आमचा प्रपंच नाही, मी अनसिक्युअर्ड नाही'', असंही ते म्हणाले. खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) हे सुपा येथे एका आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत भाष्य केलं.

Dr. Sujay Vikhe Patil
Dilip Walse News : माझ्या गृहमंत्रीपदाच्या काळात असे काही घडलेले नाही..

विखे म्हणाले, ''कोरोनाच्या काळात राज्यावर संकट होतं. त्यावेळी राज्यात भाजपची (BJP) सत्ता नव्हती. त्यामुळे मतदार संघात विकास कामे करण्यास मर्यादा होत्या. त्यावेळी केवळ केंद्राच्या योजना मतदारसंघात राबविण्यात आल्या. त्यासाठी माध्यमांनी देखील केलेल्या कामाला प्रसिध्दी दिली'', असं ते म्हणाले.

Dr. Sujay Vikhe Patil
Thackeray-Ambedkar Alliance : ठाकरेंशी युती करणाऱ्या वंचितची लोकसभा-विधानसभा निवडणुकीत कशी होती कामगिरी?

''लोकप्रतिनिधीपेक्षा जनतेचा पत्रकारांवर जास्त विश्वास असतो. आता राज्यात भाजपचे सरकार आहे. तसेच जिल्ह्याच्या नेतृत्वाला मंत्रिमंडळात देखील संधी मिळाली. त्यामुळे आता आचारसंहिता संपल्यानंतर जो विकासाचा अनुशेष राहिला आहे, तो निश्चिच भरून काढू''.

''मतदारसंघाचा विकास करणे हेच आपले ध्येत आहे. तसेच विकासाच्या माध्यमातून जनसंपर्क ठेवणे हे लोकप्रतिनिधीसाठी महत्वाचे असते. पण काही लोकप्रतिनिधी फक्त फोनवर उपलब्ध असतात. पण मी मात्र विकासकामांवर भर देणारा माणूस आहे '', असंही खासदार डॉ. सुजय विखे पाटील यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com