Thackeray-Ambedkar Alliance : ठाकरेंशी युती करणाऱ्या वंचितची लोकसभा-विधानसभा निवडणुकीत कशी होती कामगिरी?

Thackeray-Ambedkar Alliance : वंचितमुळे लोकसभेला आघाडीचे दहा उमेदवार पराभूत!
Uddhav Thackeray, Prakash Ambedkar
Uddhav Thackeray, Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Thackeray-Ambedkar Alliance : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसेवा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शिवसेने ठाकरे गटासोबत युती करणार असल्याचे जाहीर केले आहे. शिवसेनेतल्या फुटीनंतर ठाकरेंना एका प्रबळ पक्षाची गरज होतीच. आता ती वंचितच्या रूपाने पूर्ण होत आहे. यामुळे ठाकरे गटाचे राजकीय बळ वाढल्याची चर्चा आहे. ठाकरेंशी युती करणाऱ्या वंचितचा मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत वंचितची कामगिरी लक्षणीय ठरली होती. आपल्या ताकदीचं अस्तित्व वंचितने दाखवून दिले होते.

मागील लोकसभा विधानसभेत वंचितची कामगिरी कशी होती?

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने आपल्या राजकीय प्रभावाची चूणूक दाखवली होती. २०१९ च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि असुदउद्दीन ओवेसी यांच्या 'एआयएमआयएम'ची युती झाली होती. वंचित आणि 'एआयएमआयएम'च्या युतीचा जोरदार फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बसला होता.

Uddhav Thackeray, Prakash Ambedkar
Karad : काश्मीरमध्ये कॉंग्रेसच्या पुढाऱ्यांना मिठ्या मारणे हा बाळासाहेबांचा अपमानच... दीपक केसरकर

२०१९ लोकसभेच्या निवडणुकीत १० जागा अशा होत्या, जिथे भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार मतांच्या संख्येत काँग्रेस- राष्ट्रवादीच्या उमेदवारांपेक्षा पुढे होते. मात्र युती आणि आघाडीच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांमधील फरक हा वंचितला मिळालेल्या मतांपेक्षा कमी होते. यामुळे मतविभागणी होऊन काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवार पराभूत झाले, असे चित्र होते.

२०१९ लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला २४ लाख मते मिळाली होती. तर २०१९ विधानसभा निवडणुकीत या मतांमध्ये वाढ होऊन वंचितला २८ लाख मते मिळाली. विधानसभा निवडणुकीत वंचितचे उमेदवार १० जागांवर दुसऱ्या क्रमांकावर, तर तब्बल २३ जागांवर तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. यामुळे भाजपविरोधी मतांमध्ये मोठ्या प्रमाणावर विभाजन झाले होते. विधानसभेलाही २० जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचा पराभव झाला, त्याला वंचितचा फॅक्टर जबाबदार मानले जाते.

Uddhav Thackeray, Prakash Ambedkar
Thackeray-Ambedkar Alliance : मुंबई महापालिकेसाठी ठाकरे-आंबेडकर युती कितपत फलदायी ठरणार?

स्थानिक पातळीवर वंचितची पकड :

अकोल्यात वंचित हा ताकदवान पक्ष आहे. अकोल्याची जिल्हा परिषद वंचितच्या ताब्यात आहेत. तसेच यापूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभेत वंचितच्या दोन आमदारांचा प्रवेशही झाला होता. अकोल्यातील काही ग्रामपंचायतींवर वंचितचा झेंडा फडकलेला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com