BJP Vs Congress: बदलापूर येथील शालेय विद्यार्थिनीवर अत्याचार झाला. त्यावर राज्य सरकारने अतिशय जलद गतीने कारवाई केली. यासंदर्भात शासनाने आरोपीला शिक्षा देण्याचे आश्वासित केले आहे.
याच संदर्भात महाविकास आघाडीने शनिवारी बंद पुकारला होता. या बंदला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यानंतरही राज्यभर निदर्शने झाली.
त्यामुळे भाजपचे नेते चांगलेच संतापले होते. उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही महाविकास आघाडीची निदर्शने म्हणजे न्यायालयाच्या आदेशाला न जुमानणे आहे, अशी टिका त्यांनी विरोधकांवर केली.
राज्यात कायदा व सुव्यवस्था चांगली आहे. हीच विरोधी पक्षांची पोटदुखी आहे. त्यामुळेच हे सर्व लोक राज्यातील सौहार्दाचे वातावरण बिघडवण्याचा घाट घालत आहेत. मात्र भाजपचे कार्यकर्ते कदापिही ते यशस्वी होऊ देणार नाही, असा दावा या पक्षाकडून करण्यात आला आहे.
या संदर्भात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काल नाशिक शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर निदर्शने केली. भर पावसात झालेल्या या निदर्शनांना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडीवर त्यांच्या कारकीर्दीत घडलेल्या विविध गुन्हेगारीच्या घटना आणि गुन्हे घडल्याचे आकडेवारीसह सादर केली.
भाजपकडून महाविकास आघाडीला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला. बदलापूर प्रकरणावरून नाशिक शहरात गेले तीन दिवस वातावरण पेटलेले आहे. यादरम्यान काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी यावर आपली भूमिका मांडत एकमेकांवर टीका केली आहे. त्यामुळे विषयावरील राजकारण एवढ्यात संपेल असे चित्र नाही.
भारतीय जनता पक्षाने शनिवारी शहरात महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्ष एकत्र येऊन राज्य सरकार विरोधात केलेल्या आंदोलनाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. अमित घुगे, उत्तमराव उगले, वसंत उशीर, भास्कर घोडेकर, अमोल गांगुर्डे, प्रदीप पाटील, सागर शेलार, उदय रत्नपारखी, रतन काळे अधिक कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचा निषेध केला.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.