Malegaon Politics: ॲड उज्वल निकम यांची नेमणूक हे महायुतीचे राजकारणच!

Ajaj Baig Politics, Congress agitation on Badlapur issue, mahayuti`s dirty politics-मालेगाव शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी बदलापूरच्या प्रश्नावर महायुती सरकारला घेरले
Adv_Ujjwal_Nikam
Adv_Ujjwal_NikamSarkarnama
Published on
Updated on

Congress Vs BJP: बदलापूर येथील घटना दुर्दैवी आहे. मात्र त्यावरील राजकारण थांबण्याची चिन्हे नाहीत. मालेगाव येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी या विषयावर राज्य शासनाविरोधात आक्रमक निदर्शने केली.

काँग्रेस नेते प्रसाद हिरे आणि शहर अध्यक्ष एजाज बेग यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते शनिवारी एकत्र आले. बदलापूर येथील घटना राज्य सरकारचे अपयश आहे, अशी टिका करण्यात आली. त्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.

बदलापूरच्या शालेय विद्यार्थिनी वरील अत्याचार दुर्दैवी आहे. त्याबाबत राज्य सरकारच सत्ता वाचवण्यासाठी धडपडत आहे. राज्यभर सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते बेलगाम वक्तव्य करीत आहेत. त्याचा यावेळी निषेध करण्यात आला.

या विषयावर सरकारने आपले मौन सोडावे. जनतेपुढे येऊन खरे खरे सांगावे. विरोधी पक्षांवर आणि त्यांच्या नेत्यांवर तथ्यही टीका करणे थांबवावे. अन्यथा अधिक तीव्र आंदोलन होईल, असा इशारा यावेळी श्री हिरे यांनी दिला.

Adv_Ujjwal_Nikam
PM Narendra Modi: लखपती दीदी मेळाव्यात पंतप्रधान मोदी 'बदलापूर'चा उल्लेख करतील का?

बदलापूर घटनेतील आरोपींना वाचविण्याचा राज्य सरकारने पुरेपूर प्रयत्न केला आहे. पोलिसांनी दहा तास तक्रार देण्यास गेलेल्या गर्भवती महिलेला पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. त्यास गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत.

पोलिसांवर कोणी दबाव आणला? हे जाहीर करावे. या सरकारकडून आरोपींना वाचविण्याचे प्रयत्न झाले, हे सबंध जनतेला कळून चुकले आहे. त्यांना वाचविण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणजे, उज्वल निकम या भारतीय जनता पक्षाच्या अपयशी उमेदवाराला वकील म्हणून नेमण्यात आले.

ॲड निकम यांची निष्ठा भाजपशी आहे. ते पीडितांना कसा न्याय देतील?. त्याच्यावर विश्वास कोण ठेवील?. उज्वल निकम यांची नेमणूक हेच राज्य सरकारचे गलिच्छ राजकारण आहे. त्यांना ताबडतोब हटवावे. बिगर राजकीय वकील या प्रकरणासाठी नेमावा. अशी मागणी एजाज बेग यांनी यावेळी केली.

Adv_Ujjwal_Nikam
Badlapur Rape Case : संवेदनशील घटनेच्या निषेध आंदोलनातही एकी नाही

काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये यावेळी अतिशय संताप होता. विविध घोषणांचे फलक घेत राज्य सरकार विरुद्ध नाराजी आणि निषेध व्यक्त करताना महिला आक्रमक झाल्या होत्या. यावेळी तहसीलदार विशाल सोनवणे आणि मालेगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सानप यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी श्रीराम मिस्त्री, संदीप पवार, शरद खैरनार, राजाराम जाधव, निखिल पवार, नंदू भाऊ पाटील, विष्णू पवार, पद्माकर पवार आदी पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com