Ajit Pawar Politics: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणता विक्रम केला माहिती आहे का?, प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनीही सांगितले.

Sunil Tatkare; NCP leader Sunil Tatkare clarifice, Ajit Pawar made one record in politics-उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यापूर्वी केले होते.
Ajit-Pawar
Ajit-Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News: मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठी भाषेच्या प्रश्नावर एकत्र आले आहेत. यानिमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणातील दुसरा ब्रँड असलेले पवार एकत्र येणार का? याची चर्चा सुरू आहे. त्यावर अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष राज्याच्या विकासासाठी एनडीए सोबत गेला आहे. त्यासाठी पक्षाच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत ठराव करण्यात आला आहे. पक्षाची विचारधारा कायम ठेवून भाजप सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे सुनिल तटकरे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री केव्हा होणार? आणि दोन्ही पवार एकत्र येणार का? याची वारंवार चर्चा होत असते. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी अजित पवार यांनी राज्यात सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ आणि विविध सरकारमध्ये काम केले आहे.

Ajit-Pawar
Sunil Tatkare Politics: नाशिक महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची सूत्रे छगन भुजबळांकडे!

अर्थ व नियोजन खात्याचे मंत्री म्हणून देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वाधिक काळ काम केले. त्यामुळे हे रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. महाराष्ट्रात यापूर्वी अजित पवार यांच्याप्रमाणे प्रदीर्घकाळ या खात्याचा कारभार कोणीही पाहिलेलं नसल्याने हे रेकॉर्ड त्यांच्या नावावर असल्याचे तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर सांगितले.

विविध मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये प्रदीर्घकाळ उपमुख्यमंत्री म्हणून काम केलेले अजित पवार मुख्यमंत्री केव्हा होणार याबाबत मात्र तटकरे यांनी कोणतेही स्पष्ट मत व्यक्त करण्याचे टाळले. आमचा पक्ष महायुती सोबत आहे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुतीचा घटक म्हणूनच मतदारांना सामोरे जाईल, असे ते म्हणाले.

विधानसभा निवडणुकीत राज्यातील मतदारांचा मोठा प्रतिसाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाला. पक्षाचे ४१ आमदार निवडून आले. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यात सर्वच्या सर्व सात उमेदवार विजयी झाले. त्यामुळे नाशिकमध्ये पक्षाचे प्राबल्य पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचा दावा त्यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या यशामध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकीत स्थानिक स्तरावरील निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात येणार आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यासाठी वरिष्ठांचा आग्रह आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना येत्या निवडणुकीत निश्चितच न्याय मिळेल असे प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

--------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com