
Sunil Tatkare : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता धुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी (अजित पवार गट) कामाला लागली आहे. त्यादृष्टीने पक्षात मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरु आहे. मात्र निष्ठावंत कार्यकर्त्यांनी त्यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्याशी बोलताना काहीशी नाराजी व्यक्त केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे शुक्रवारी धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या उपस्थिती शहरातील पारोळा रोडवरील मनभावना बॅक्वेट हॉल मध्ये पक्षाची आढावा बैठक झाली. यावेळी बैठकीत पक्षाचे प्रमोद साळुंखे यांनी थेट प्रदेशाध्यक्षासमोर नाराजी व्यक्त केली.
राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची स्थापना झाली अगदी तेव्हापासून प्रामाणिकपणे काम करीत आहोत. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या तोंडावर पक्षात मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे. त्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांवर जर अन्याय होत असेल तर आम्ही राजीनाम द्यायला तयार आहोत असा दमच जुन्या कार्यकर्त्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना भरला.
यावेळी आमदार अनिल पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, सुनील नेरकर, इर्शाद जहागिरदार, सुमीत पवार, सचिन दहिते उपस्थित आदी होते.
आगामी निवडणुकांमध्ये अपेक्षित लक्ष्य गाठण्यासाठी राष्ट्रवादी पक्षात अनेक कार्यकर्ते दाखल होत असून त्यांना पक्षात प्रवेश दिला जातो आहे. जुन्या व नवीन कार्यकर्त्यांमध्ये ताळमेळ बसवा, यासाठी बैठकीत सुनील तटकरे यांनी पदाधिकाऱ्यांनी सुचना देत कामाला लागा अशा सूचना केल्या.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसला महायुतीमध्ये सन्मानपूर्वक वागणूक मिळते आहे. त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. अशी भूमिका तटकरे यांनी यावेळी मांडली.
स्थानिक पातळीवर राजकीय परिस्थिती लक्षात घेतली जाईल. समन्वयाचा प्रयत्न असेल. महायुतीमध्ये राष्ट्रवादीला सन्मानपूर्वक वागणूक मिळत असून विरोधाभास येणार नाही यादृष्टीने आम्ही पुढे जातोय असे तटकरे म्हणाले. 1995 नंतर राज्यात महायुती व आघाड्याचेंच सरकारे आहेत. आता २०२९ व त्यानंतरही महायुतीच सत्तेत असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात प्रबळ विरोधक उरले नाहीत असही ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.