Suresh dada Jain Latest News : आपण सामाजिककार्याच्या माध्यमातून जनतेची सेवा करीत आहोत, राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त आहोत. भविष्यात आपल्या घरातील कोणीही वारसदार म्हणून राजकारणात येण्याची शक्यता नाही. आजची राज्यातील राजकीय स्थितीही फारशी उत्साहवर्धक नाही, असे मत माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी व्यक्त केले आहे. जळगाव येथे पत्रकारांशी ते बोलत होते.
सुरेशदादा शैक्षणिक व उद्योजक विकास (एस.डी.सीडस) योजनेच्या माध्यमातून दरवर्षी गुणवंत गरीब विद्यार्थ्याना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. त्या अंतर्गत मंगळवार (ता.२१) रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पद्मश्री आनंदकुमार (पटना), सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल मुथ्था यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम जळगावात होणार आहे. त्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यावेळी बोलताना ते म्हणाले, कि "आपण राजकारणापासून अलिप्त आहोत. यापुढेही आपला राजकारणात सक्रिय होण्याचा कोणताही विचार नाही, तसेच आपल्या घरातील कोणीही भविष्यात राजकारणात येण्याची शक्यताही नाही."राज्यातील सद्याच्या राजकारणाबाबत बोलताना ते म्हणाले, कि "राज्यातील राजकीय परिस्थिती फारशी उसाहवर्धक नाही. यापेक्षा राजकारणावर आपण अधिक काही बोलणार नाही."
जळगाव शहरातील सद्याच्या विकासाच्या समस्येबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "आजची जळगाव शहराची स्थिती पाहून दु:ख होत आहे. शहरातील थांबलेली प्रगती पाहून वाईट वाटते. परंतु कोणीतरी पुढाकार घेवून जळगाव शहराला पूर्वीचे वैभव प्राप्त करून द्यावे, असे आपल्याला वाटते. आपण सन १९८० मध्ये पहिल्यांदा विधानसभेत जळगावमधून निवडून आलो. त्यावेळी आपण जळगाव शहराच्या विकासासाठीही काम केले. त्यावेळी आपल्याकडे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची एक टीम होती. मित्र मंडळी होती, त्या माध्यमातून आपण जळगाव शहराचा विकास केला आहे. जळगाव शहर सुंदर करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र ती टीम आपल्याकडे तसेच मित्रमंडळीही इकडे तिकडे झाले आहेत. गेल्या पंधरा वीस वर्षांत शहराच्या विकासासाठी गाडीचे चाक रूतलेले आहे. त्याला कुणीतरी बाहेर काढणे आवश्यक आहे. परंतु कुणीतरी येईल निश्चित शहराच्या विकासाच रूतलेल चाक बाहेर काढेल ते काम परमेश्वर निश्चित करेल, कारण त्याला काळजी असतेच."
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.