Maharashtra Politics : अद्वय हिरेंवर केली तशीच कारवाई छगन भुजबळांवर होईल का?

Dada Bhuse v/s Advay Hire Politics, Hiray supporters criticized On Police Action-हिरे समर्थक म्हणतात, हिरेंवरील कारवाई केवळ राजकीय आकसापोटी करण्यात आली.
Advay Hire, Pavan Thackeray & Chhagan Bhujbal
Advay Hire, Pavan Thackeray & Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Malegaon Politics : जिल्हा बँकेच्या थकीत कर्ज प्रकरणात अद्वय हिरे यांच्याविरोधात कारवाई झाली. अशीच सात प्रकरणे जिल्हा बँकेत प्रलंबित आहेत. त्यात छगन भुजबळ यांच्याशी संबंधित आम्रस्ट्राँग संस्थेचीदेखील दीर्घकाळ थकबाकी आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणार का? असा सवाल शिवसेना नेते तसेच हिरे समर्थक पवन ठाकरे यांनी केली. (NDCC Bank non agriculture loan issue took a political turn in Malegaon)

यासंदर्भात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Nashik) प्रशासकांच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण झाला आहे. सत्ताधारी पक्षाच्या (Maharashtra Government) मंत्र्यांच्या राजकीय दबावातून ही कारवाई झाल्याची टीका करण्यात आली. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावरदेखील त्यांनी टीका केली आहे.

Advay Hire, Pavan Thackeray & Chhagan Bhujbal
Balasaheb Thackeray Memorial Day : कडेकोट बंदोबस्तात ठाकरे कुटुंबीयांनी घेतले बाळासाहेबांच्या स्मृतींचे दर्शन

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रेणुका सूतगिरणी संस्थेसाठी घेतलेले कर्ज थकविल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेने शिवसेना उपनेते डॉ. अद्वय हिरे यांना अटक केली. थकबाकी वसुलीसाठी जिल्हा बॅंकेने कडक पावले उचलली.

जिल्हा बँकेने अनेक बिगर शेती संस्थांशी संबंधित मोठी थकबाकी आहे. त्यांच्याकडे मोठी थकबाकी असल्याने जिल्हा बँक दीर्घकाळ अडचणीत आहे. इतर सहा बिगरशेती प्रकरणांची कोट्यवधींची रक्कम थकली असून, त्यांच्या विरोधात आता जिल्हा बॅंक काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे. यात, नाशिक व निफाड सहकारी साखर काराखान्यांसह ऑर्मस्ट्रॉग कारखान्याचा समावेश आहे.

यासंदर्भात उपलब्ध झालेल्या माहितीमध्ये २०१२ मध्ये रेणुकादेवी संस्थेने जिल्हा बँकेकडून ७.४५ कोटी कर्ज घेतले होते. हे थकीत कर्ज फेडले नाही. जिल्हा बँकेने डिसेंबर २०१६ मध्ये त्या संबंधीची नोटीस बजावण्यात आली. व्याजासह कर्ज भरण्याचे आदेश दिले होते. रमजानपुरा (मालेगाव) पोलिस ठाण्यात ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा बँकेचे विभागीय अधिकारी गोरख जाधव यांनी तक्रार दाखल केली.

Advay Hire, Pavan Thackeray & Chhagan Bhujbal
Priyanka Gandhi News : काँग्रेसमध्ये हायकमांड कोण? प्रियांकांनी दिले उत्तर; रायबरेलीतून निवडणूक लढण्यावर बोलल्या...

डॉ. हिरे यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. अशा कारावईचीदेखील गरज होती. तशी गरजदेखील आहे. मात्र, अशी कारवाई करताना सोयीनुसार झाल्यास त्याला राजकीय वास नक्कीच येईल. बिगरशेतीचे वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना (देवळा), निफाड सहकारी साखर कारखाना, नाशिक सहकारी साखर कारखाना, आर्मस्ट्रॉग कारखाना, श्रीराम बॅंक, ट्रॅक्टर हाऊस या संस्थांना दिलेले कर्ज थकले आहे. त्यांच्यावर कारवाई कधी होणार?, असा प्रश्न हिरे समर्थक विचारीत आहेत. त्याचे उत्तर काय येते याची उत्सुकता आहे.

Advay Hire, Pavan Thackeray & Chhagan Bhujbal
Sambhajiraje On Bhujbal : भुजबळांच्या भाषणानंतर संभाजीराजे संतापले; ‘ते पाप करत आहेत, त्यांना मंत्रिमंडळातून हाकला’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com