Sureshdada Jain News : जळगावात मोठा ट्विस्ट; राजकारणातून संन्यास घेणाऱ्या सुरेशदादा जैन यांचा भाजपला पाठिंबा

Loksabha Election 2024 : ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत जैन यांनी सक्रिय राजकारणातून घेतलेला संन्यास चर्चेचा विषय ठरला होता.
Suresh Jain
Suresh Jain Sarkarnama

Jalgaon News : ऐन लोकसभा निवडणुकीत काही दिवसांपूर्वीच जळगावात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. माजी मंत्री तथा आमदार सुरेशदादा जैन यांनी 8 मे 2024 रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्राथमिक सदस्यतेचा राजीनामा दिला होता. शिवाय आता इथून पुढे आपण सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. पण अवघ्या चार दिवसांतच त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्यासह मंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी (ता.11) सुरेश जैन (Sureshdada Jain) यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. या नेत्यांमध्ये बंद दाराआड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खलबतं झाली. यावेळी जैन यांनी आपण राजकीय संन्यास घेतला असून कोणत्याही पक्षात सहभागी होणार नाही. पण याचवेळी त्यांनी चांगलं काम करणाऱ्या कोणत्याही पक्षाच्या पाठीशी आपण राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सुरेश जैन हे कोणत्या पक्षाला आणि उमेदवाराला साथ देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.आता त्यांनी जळगावात भाजपला आपला जाहीर पाठिंबा देत असल्याची घोषणा केली आहे.

Suresh Jain
Arvind Kejrival News : तुरुंगातून बाहेर येताच केजरीवालांचं मोठं भाकीत; मोदींनंतरचा पंतप्रधानच सांगून टाकला

ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत जैन यांनी सक्रिय राजकारणातून घेतलेला संन्यास चर्चेचा विषय ठरला होता. जैन यांनी 1980 पासून सक्रीय राजकारणात प्रवेश केल्यानंतर जवळपास 34 वर्ष आमदार राहिले आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वप्रथम त्यांना मंत्रिपद दिलं होतं.यामध्ये जिल्हा बँक,दूध विकास,मिनी मंत्रालय,साखर कारखाने अशा विविध क्षेत्रात जिल्ह्याचे विकासाचे व्हिजन, शेतकरी व सामान्य जनतेला हे केंद्रस्थानी ठेवून त्यांनी कामे केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सुरेशदादा जैन यांचा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. पण याचवेळी आपण भाजपात प्रवेश करणार नसल्याचं ठामपणे सांगितलं आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या विकासाच्या धोरणावर जो चालत असेल त्यांना आपला पाठिंबा असेल. आपल्यावर भाजपचा कोणताही दबाव नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आपण मंत्रिमंडळात असताना मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना घाबरलो नाही. मी तुमचा सालदार नाही असे त्यांना सांगितले होते. त्यामुळे कोणाचाही दबाव आपण स्वीकारणार नसल्याची भूमिकाही त्यांनी मांडली आहे.

तर 2014 सालापासून ते तब्येतीच्या कारणांमुळे राजकारणापासून दूर राहिले होते. जरी ते राजकारणापासून लांब असले तरी लोकांमध्ये त्यांच्याबद्दल खूप आदराची भावना आहे. त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतानाच राष्ट्र,राज्य, जिल्हा व आपल्या जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ते मार्गदर्शक भूमिकेतच राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. तसंच त्यांनी आपला निर्णय जाहीर करताना बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन समस्त शिवसैनिकांबद्दल प्रेम व आदरही व्यक्त केला.

Suresh Jain
Arvind Kejrival News : तुरुंगातून बाहेर येताच केजरीवालांचं मोठं भाकीत; मोदींनंतरचा पंतप्रधानच सांगून टाकला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com