Nashik Bribe : निवृत्तीला वर्षभर बाकी, पण अवघ्या 20 हजारांच्या लाचेने केला गेम ; सुरगाण्याचे PSI एसीबीच्या जाळ्यात

Surgana PSI bribe case : ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप असून अखेरीस २० हजार रुपये देण्यावर तडजोड झाली. एसीबीने सापळा लावला अन् दोघे रंगेहात पकडले गेले.
bribe Case
bribe Casesarkarnama
Published on
Updated on

Nashik Bribe : अवघ्या वर्षभरावर निवृत्ती असताना सुरगाणा पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक (PSI) चंद्रकांत शिवाजी दवंगे (वय ५७) हे २० हजार रुपयांच्या लाच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले.

सुरगाणा पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत संशयिताच्या आई-वडिलांकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या उपनिरीक्षकासह एका खासगी व्यक्तीला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. पोलिस उपनिरीक्षक दवंगे यांनी इब्राहिम करीम वाणी यांच्या मदतीने लाचेची रक्कम स्विकारली असता सापळा लावलेल्या पोलिसांनी दोघांना रंगेहात बेड्या ठोकल्या.

एसीबीकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराच्या मुलाविरुद्ध सुरगाणा पोलिस ठाण्यात अपहरण व लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानवे गुन्हा दाखल आहे. तो सध्या नाशिक सेंट्रल जेलमध्ये आहे. या गुन्ह्याचा तपास दवंगे यांच्याकडे होता. त्यांनी १९ जून रोजी संशयिताच्या आई-वडिलांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावून दिवसभर बसवून ठेवले.

त्यानंतर, ‘तुम्हालाही गुन्ह्यात आरोपी करतो,’ अशी धमकी देत ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. अखेरीस २० हजार रुपये देण्यावर तडजोड झाली. दरम्यान, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पडताळणीत तक्रारीत तथ्य आढळल्यानंतर सापळा रचण्यात आला.

bribe Case
Nashik Bribery Case : नाशिकमध्ये पहिल्यांदाच असं घडलं... PhonePe'वर लाच स्वीकारल्याचा धक्कादायक प्रकार; बदली झालेल्या PSIवर ACBचा गुन्हा

अशी उघडकीस आली लाचखोरी

सुरुवातीला तक्रारदाराला २१ आणि २४ जून रोजी लाचेची रक्कम देण्यासाठी पाठविण्यात आले; मात्र दवंगे बाहेरगावी असल्याने व्यवहार झाला नाही. त्यानंतर ३० जून रोजी तक्रारदार लाचेची रक्कम घेऊन थेट पोलिस ठाण्यात गेले असता, दवंगे यांनी ती स्वीकारण्यास टाळाटाळ केली.

bribe Case
Nashik Bribe Crime: 'सीबीआय'ची मोठी कारवाई; भविष्य निर्वाह निधी आयुक्तांसह दोघांना अटक

अखेर शुक्रवारी (ता. ३१) त्यांनी तक्रारदाराला सुरगाणा पोलिस ठाण्याच्या जुन्या इमारतीलगत असलेल्या किराणा दुकानात बोलावले. तेथे खासगी व्यक्ती इब्राहिम वाणी याच्याकडे लाचेची रक्कम देण्यास सांगितले. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांना रंगेहाथ ताब्यात घेतले. याप्रकरणी दवांगे व वाणी या दोघांविरुद्ध सुरगाणा पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com