Nashik Bribery Case : नाशिकमध्ये पहिल्यांदाच असं घडलं... PhonePe'वर लाच स्वीकारल्याचा धक्कादायक प्रकार; बदली झालेल्या PSIवर ACBचा गुन्हा

PSI Harshvardhan Bahir, Nashik ACB : गुन्ह्यातून वाचवण्यासाठी ४ लाखांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल, PSI हर्षवर्धन बहीर यांच्यावर बदलीनंतर कारवाई करण्यात आली आहे.
Nashik PSI booked for accepting bribe via PhonePe
Nashik PSI booked for accepting bribe via PhonePeSarkarnama
Published on
Updated on

Nashik police officer accepts bribe through UPI: गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी व अटक टाळून मदत करण्याच्या मोबदल्यात 4 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर यांच्यासह अन्य दोघांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून तिघांनाही अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हर्षवर्धन बहीर यांची बदली झाल्यानंतर ACB ने ही कारवाई केली आहे.

या प्रकरणातील संशयित हर्षवर्धन बहीर यांची येवला तालुका पोलिस ठाण्यातून अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर पोलिस ठाण्यात बदली झाल्यानंतरही तक्रारदाराच्या तक्रारीची दखल घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) चौकशी केली. पाटोदा येथील एका गुन्ह्यात मदत करण्यासाठी बहीर यांनी मध्यस्थामार्फत लाचेची मागणी केल्याचे पडताळणीत निष्पन्न झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Nashik PSI booked for accepting bribe via PhonePe
Bribery Case : कामाच्या बिलासाठी ३ टक्के कमिशन : लाचखोर विस्तार अधिकाऱ्याला कार्यालयातच अटक; ACBच्या कारवाईने पंचायत समितीत खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या भावाला एका गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी व अटक टाळण्यासाठी सुरुवातीला चार लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. तक्रारीनंतर एसीबीने पडताळणी केली असता आरोपींनी लाचेच्या रकमेत तडजोड करून दोन लाख ५० हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे उघड झाले.

तसेच या व्यवहाराचा भाग म्हणून ९ एप्रिल २०२६ रोजी बहीर यांच्यासाठी ५० हजार रुपये एका मध्यस्थाने फोन-पेच्या माध्यमातून स्वीकारल्याचे तपासात समोर आले. उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने खासगी इसमाच्या मध्यस्थीने प्रथमच फोन पे वर लाच स्विकारल्याचा हा जिल्ह्यातील पहिलाच गुन्हा ठरला आहे.

Nashik PSI booked for accepting bribe via PhonePe
Bribery Case Jalgaon : लाचखोर जिल्हाधिकाऱ्याच्या सीलबंद घरातून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न, दोघांना रंगेहात अटक

नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तालुका पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी करीत आहेत. या कारवाईमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com