Gunratna Sadavarte : मनसेने सदावर्तेंवरील उपचारांसाठी घेतली डॉक्टरांची वेळ

Political News : अ‍ॅड. सदावर्ते यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचा दावा करीत मनोविकार तज्ज्ञ डॉ. झालानी यांची वेळ घेतली आहे.
Gunratna Sadavarte-Raj Thackeray
Gunratna Sadavarte-Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nagar News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक झाली आहे. अ‍ॅड. सदावर्ते यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचा दावा करीत येथील मनविसेचे राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा यांनी नगरमधील प्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ डॉ. झालानी यांची वेळ घेतली आहे. येत्या 1 फेब्रुवारीला अ‍ॅड. सदावर्ते तुमच्याकडे उपचारांसाठी येतील, असे पत्रही त्यांनी डॉ. झालानींना दिले आहे व त्याची माहितीही अ‍ॅड. सदावर्ते यांना पत्र पाठवून दिली आहे.

यासंदर्भात सुमित वर्मा यांनी डॉ. झालानी यांना पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, गुणरत्न सदावर्ते हे गेल्या काही दिवसांपासून नैराश्यातून टीका करीत आहेत. त्यांच्यावर योग्य उपचार करून त्यांना लवकर बरे करावे, यासाठी त्यांची वेळ आपल्या दवाखान्यात आरक्षित ठेवावी म्हणून विनंती करतो.

Gunratna Sadavarte-Raj Thackeray
Udayanraje Bhosale News : मराठा आरक्षणाची लढाई जिंकताच उदयनराजे भोसलेंची मोठी मागणी; म्हणाले, 'बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात...'

येत्या 1 तारखेला ते आपल्याकडे उपचारासाठी येतील, अशी अपेक्षा आहे. आपण योग्य तो उपचार करून त्यांना बरे करावे, ही विनंती, असे यात म्हटले आहे.त्यासोबतच अ‍ॅड. सदावर्ते यांनाही पत्र पाठवले आहे.

त्यात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून आपल्याला मानसिक रोग जडल्याचे दिसून येत आहे. आपल्याकडून विविध विषयांवर कारण नसताना व संबंध नसताना टीका केली जात आहे. त्यामुळे आपल्याला काही मानसिक आजार झाला आहे, असे जाणवत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तुम्हाला चालता-फिरता फक्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हेच दिसतात. त्यामुळे काहीही झाले की थेट राज ठाकरेंवर टीका करीत आहात. त्यामुळे हा एक मानसिक आजार मानला जातो. त्यामुळे यावर लवकरच उपचार घ्यायला हवा. त्यामुळे आपल्याबद्दल काळजी वाटत आहे.

या भावनेतून नगरचे प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. झालानी यांच्याकडे आपल्या नावे वेळ घेतली आहे. त्यामुळे आपल्यावर प्रेम करणार्‍या लोकांखातर उपचार करून घ्या. याचा सर्व खर्च आम्ही करायला तयार आहोत. लवकर बरे व्हा, असे आवाहन वर्मा यांनी अ‍ॅड. सदावर्ते यांना केले आहे.

(Edited by - Sachin waghmare)

Gunratna Sadavarte-Raj Thackeray
Gunaratna Sadavarte Challenge Manoj Jarange : मनोज जरांगेंना गुणरत्न सदावर्तेंचे चॅलेंज, अध्यादेशाने हुरळून जाऊ नका...

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com